मुंबई : बॉलिवूडची फर्स्ट लेडी सुपरस्टार श्रीदेवी (Sridevi) आणि फिल्म मेकर बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मोठी लेक जान्हवी कपूरनं तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. सध्या जान्हवी तिचा आगामी चित्रपट 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट OTT प्लॅट फॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  तर दुसरीकडे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, जान्हवीनं तिचे वडील बोनी कपूर यांना तिच्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी हव्यात हे सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गुड लक जेरी' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, जान्हवीनं सिद्धार्थ कननच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जान्हवीनं सांगितलं की वडिलांची एकच इच्छा आहे. त्यांना कशाचीही पर्वा नाही. वडिलांची इच्छा आहे की त्यांचे दोन्ही जावई त्यांच्यासारखेच उंच असावेत. जान्हवीने सांगितले की तिचे वडील बोनी कपूर यांची उंची 6’1 आहे. वडिलांबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, 'आम्ही लहान होतो तेव्हा वडील आम्हाला सांगायचे की तुम्ही दोघे संपूर्ण जग फिरा, जेणेकरून लग्नानंतर तुम्ही तुमच्या पतीला सांगू शकाल की लग्नाआधी वडिलांनी आम्हाला जगात फिरवलं.' 



जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' हा क्राइम थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात ती एका ड्रग माफियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेननं केले आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त नीरज सूद, साहिल मेहता, संदीप मेहता, जसवंत सिंग दलाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


दरम्यान, याआधी जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जान्हवी मध्यरात्री क्रेविंग होते म्हणून गुपचूप स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्या मैत्रिणीनं तिला रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांमध्ये संवाद आहे, 'नागिन 6' अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची आहे.  तिची मैत्रिणं म्हणते, 'तू मध्यरात्री चालत आहेस?' तेव्हा जान्हवी म्हणते, 'ऐक, मी चालते तेव्हा वेळ दिसत नाही आणि वेळ पाहून कधीच चालत नाही, कारण कोणी पाहिलं तर मला माझी फिगर पाहतात आणि मी माझी फिगर मेनटेन ठवते.' जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'रुही', 'गुंजन सक्सेना'मध्ये दिसली. पाच वर्षांत तिनं केवळ 3 चित्रपटांत काम केले असले तरी प्रत्येक चित्रपटात तिचा अभिनय सुधारताना दिसतो. 'गुड लक जेरी'च्या ट्रेलरमध्ये तिच्या कामाचे कौतुक होत आहे.