मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसल्या तरीही कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एका कायमचं स्थान तयार केलं आहे. विविध भूमिका साकारत एक अभिनेत्री म्हणून संपन्न असणाऱ्या श्रीदेवी यांनी आई, पत्नी म्हणूनही त्यांची जबाबदारी सुयोग्य रितीने पार पाडली होती. म्हणूनच की काय, आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्य श्रीदेवी यांता उल्लेख होताच क्षणार्धातच भावूक होतात. नुकताच असा एक प्रसंग पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूर येथील मादाम तुसाँ या संग्रहालयात हिंदी कलाविश्वातील पहिल्या महिला सुपरस्टार म्हणऊन ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा एक सुंदर पुतळा साकारण्यात आला आहे. त्याच पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी श्रीदेवी यांचे पती, निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली म्हणजेच खुशी आणि जान्हवीची उपस्थिती पाहायला मिळाली होती. 



पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ज्यावेळी कपूर कुटुंबीयांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा त्यांत्या नजरा 'श्री'च्या पुतळ्यावरच खिळल्या. अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मिस हवाहवाईच्याच रुपात हा पुतळा साकारण्यात आला आहे. ज्यामध्ये बरेच बारकावेही टीपण्यात आले आहेत. हा पुतळा इतका बोलका आहे, की जणू काही खुद्द श्रीदेवीच आपल्या शेजारी उभ्या असल्याचा भास होतो. अगदी अशाच भावना त्या क्षणाला बोनी कपूर, जान्हवी आणि खुशीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाल्या. 




यावेळी आपलं मनोगत व्यक्त करतेवेळी बोनी कपूर यांना गहिवरुन आलं. ज्यावेळी जान्वहीने त्यांना धीर दिला. बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुलींना पाहता 'श्री' कायमच या मंडळींसोबत आहे, हे खरं.