...तर `नो एन्ट्री 2`मध्ये दिसले असते सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान
`नो एन्ट्री 2` चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. 2005 मध्ये रिलीज झालेल्या `नो एन्ट्री` चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत होते. मात्र चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आता तिघे पण दिसणार नाहीत.
No Entry 2: 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नो एन्ट्री' हा चित्रपट सर्वात जास्त आवडलेला कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान हे मुख्य भूमिकेत होते. तिघांची कॉमेडी ही खूप प्रसिद्ध झाली होती. अशातच आता अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या 'नो एन्ट्री 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीये. प्रेक्षकांना वाटत होते या चित्रपटात पहिलीच तिघांची जोडी दिसेल.
मात्र, 'नो एन्ट्री 2' चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटातील सर्व कलाकार बदलण्यात आले आहेत. नुकताच बोनी कपूर यांनी खुलासा केलाय. ज्यामध्ये पहिल्या कलाकारांकडे 'नो एन्ट्री 2' नकार देण्यासाठी वेगवेगळी कारणे होती. त्यासोबतच त्यांनी या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत देखील खुलासा केलाय.
News18 Showsha ला दिलेल्या मुलाखतीत, बोनी कपूर यांनी 2005 च्या कॉमेडी चित्रपट 'नो एन्ट्री'च्या सिक्वेलची चर्चा केली. अनेक चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, या चित्रपटातील जुन्या कलाकारांना सिक्वेलमध्ये का ठेवण्यात आले नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना बोनी कपूर म्हणाले की, 'मी बराच वेळ वाट पाहिली, परंतु प्रत्येकांनी स्वतःची कारणे दिली आणि मी त्या कारणांचा आदर करतो असं ते म्हणाले.
'नो एन्ट्री 2' चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार
तसेच बोनी कपूर यांनी चाहत्यांना आश्वासन दिले की 'नो एन्ट्री'चा सीक्वेल प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. याशिवाय चित्रपट निर्मात्यांनी नमूद केले की ज्यांनी हा विषय ऐकला आहे अशा लोकांना वाटते की सर्व योग्य घटकांसह मागील 'नो एन्ट्री' चित्रपटापेक्षा तो चांगला आहे. त्याच वेळी, बोनी कपूर यांनी पुष्टी केली की 'नो एन्ट्री 2' चित्रपटाचे शूटिंग जून किंवा जुलै 2025 मध्ये सुरू होईल.
या दिवशी प्रदर्शित होणार 'नो एन्ट्री 2'
यासोबत बोनी कपूर यांनी 'नो एन्ट्री 2' चित्रपटाच्या रिलीजबाबत बोलत असताना सांगितले की, हा चित्रपट 26 ऑक्टोंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला पोस्ट-प्रॉडक्शन कामाची आवश्यकता असल्याने ते निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी होतील अशी आशा आहे. ऑगस्टमध्ये पिंकविलाच्या एका अहवालात असे म्हटले होते की, 'नो एन्ट्री 2'मध्ये वरुण, अर्जुन आणि दिलजीत हे दुहेरी भूमिकेत आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात दुहेरी आनंद मिळणार आहे. तसेच या चित्रपटात सात प्रमुख अभिनेत्रींचा समावेश आहे.