मुंबई : एक पूजा आणि तिचे अनेक चाहते म्हणजे 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या कमाईचे आकडे सलग चढत्या क्रमांकावर आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच तिसऱ्या दिवसापर्यंत 'ड्रीमगर्ल'ने ४४.५७ कोटी रूपायांचा गल्ला जमा केला आहे. 'ड्रीम गर्ल' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आयुषमानचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रेट अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कामाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून कळवले आहेत. 'मै पुजा बोल रही हु, क्या हुआ आवाज अच्छी नही लगी...' असं म्हणत अभिनेता अयुषमान खुरानाचा 'ड्रीम गर्ल' रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. चित्रपटात 'करमवीर' ही व्यक्तिरेखा साकारत असलेला आयुषमानच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. 


सुशिक्षित बेरोजगार असलेला आयुषमान खुराना काही पैंश्यासाठी नाटकात सितेची भूमिका साकारतो. त्यानंतर त्याला कौशल्याच्या जोरावर राजेश खन्नांच्या कॉल सेंटर मध्ये काम मिळते. कोणालाही माहित नसलेल्या पुजाच्या म्हणजे आयुषमानच्या प्रेमात अनेक लोक पडतात. आणि त्याच्या सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतात.