मुंबई : अखेर तो दिवस आला आणि रुपेरी पडद्यावर 'पावनखिंड' सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाच्या ट्रेलरनेचं प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर 18 फेब्रुवारी रेजी सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल झाला आणि समोर गनिम उभा असताना पावनखिंडीमध्ये झालेला रणसंग्राम मराठ्यांनी कसा गाजवला आणि त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं... तो क्षण प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर अनुभवता येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावनखिंड सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने चांगलीचं मजल मारली. 'पुष्पा'नंतर पावनखिंड सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला दिसत आहे. 


18 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने उत्तम कामगिरी केली. पहिल्या दिवशी सिनेमाने 1.15 कोटी रुपयांचा गल्ल जमवला. त्यानंतर शनिवारी सिनेमाने 2.05 कोटी रुपये कमले,  रविवारी सिनेमा 3 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली...


सिनेमाने आतापर्यंत 6 कोटी रुपयांचा  गल्ला जमा केला आहे. सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी पाहाता पुष्पा सिनेमा देखील फेल ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


तर दुसरीकडे अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा देखील 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पावनखिंड आणि 'गंगूबाई काठियावाडी' दोन सिनेमांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.