१३ व्या दिवशीही `संजू`ची जोरदार कमाई
रणबीर कपूरच्या संजूचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला आहे.
मुंबई : रणबीर कपूरच्या संजूचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला आहे. आता बॉक्स ऑफिसवरील कमाई ३०० कोटी या जादूई आकड्याच्या जवळपास पोहचली आहे. या सिनेमाबरोबरच रणबीर कपूरने सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून १३ व्या दिवसापर्यंत सातत्याने कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स तोडले जात आहेत आणि हा पराक्रम सातत्याने सुरु आहे.
नवा रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत
या सिनेमाने १३ व्या दिवशी २९० कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमाचे हे यश रणबीर कपूरसाठीही मोठे आहे. रणबीरला बॉलिवूडमध्ये ११ वर्ष झाली. आतापर्यंतच्या त्याच्या सिनेमा प्रवासात त्याचा पहिला सिनेमा आहे जो ३०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त काहीच पावले दूर आहे.
इतकी झाली कमाई
संजू सिनेमाने 9.25 कोटींपासून सुरु केलेली कमाई बुधवारी 290 कोटींपर्यंत पोहचली. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानींनी केले आहे. रणबीर कपूरशिवाय विक्की कौशलच्या अभिनयाचे यात कौतुक होत आहे. संजू सिनेमा भारतात 4000 स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता.