मुंबई : खूप दिवसांपासून चर्चेत असलेला 'द स्काय इज पिंक' सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. 'मार्गरिटा विद ए स्ट्रॉ' फेम निर्माती शोनाली बोसने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. प्रियंका चोप्रा या सिनेमातून खूप वर्षाने कमबॅक करत आहे. या सिनेमात प्रियंकाबरोबरच झायरा वसीम, फरहान अख्तर आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहे. 'द स्काय इज पिंक' हा सिनेमा भरपूर इमोशन्ल असला तरिही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचं पहिल्या दिवसांच कलेक्शन काही खास राहिलेलं नाही. या सिनेमाने ओपनिंग डेच्या दिवशी फक्त 2.50 करोड रुपयांची कमाई केली आहे. यानुसार, सिनेमाची सुरूवात खूप खराब झाल्याचं म्हटलं जातं आहे. तर दुसरीकडे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा सिनेमा 'वॉर' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'वॉर' सिनेमाचा फटका 'द स्कॉय इज पिंक'ला पडत आहे. 


'द स्काय इज पिंक' हा सिनेमा मोटीवेशनल स्पीकर आएशा चौधरीवर आधारित आहे. आएशा पल्मनरी फायबरोसिस (Pulmonary Fibrosis) या आजाराने ग्रासलेली होती. प्रियंका आणि फरहान आएशाच्या पालकांची भूमिका साकारत आहेत. तर झायरा आएशाची भूमिका साकारत आहे. 


लग्न झाल्यानंतर प्रियंका चोप्राचा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असं वाटत होतं पण झालं उलटं. सिनेमाने पहिल्याच दिवशी खूप कमी कमाई केली आहे. 'वॉर' हा सिनेमा दहाव्या दिवशी देखील चांगली कमाई करत आहे. त्यामुळे आता आशा केली जातेय की, शनिवार आणि रविवारचा फायदा या सिनेमाला होईल आणि कलेक्शन चांगल होईल.