मुंबई : राधिका आपटे (Radhika Apte) आज ट्विटरवर ट्रेंड होत आहे. पण ट्रेंड कोणत्या सकारात्मक बातमीने नाही तर निगेटिव्ह बातमीने आहे. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होत आहे. #BoycottRadhikaApte बायकॉट राधिका आपटे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सिनेमा आणि कॅरेक्टरवर वेगवेगळे अनुभव करत आहेत. पण आज याच गोष्टीमुळे राधिका आपटे ट्रोल झाली आहे. तिला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझर्स सोशल मीडियावर राधिकाच्या फोटोवर अश्लिल कमेंट करत आहे. 



तसेच काही जण राधिका आपटेला राज कुंद्रा केस प्रकरणातही लिंक करत आहेत. युझर्स राधिका आणि इतर कलाकारांना राज कुंद्रा केस प्रकरणात गप्प राहिल्यामुळे ट्रोल करण्यात आलं. सेलेब्स अन्याय आणि धार्मिक भावना दुखावल्यावर कमेंट करतात. पण या प्रकरणात सगळेच गप्प आहे. 



राधिका आपटेला पार्च्ड आणि हंटर सिनेमांवरून ट्रोल केलं जात आहे. त्यांचं म्हणणं आहे की, राधिका भारतीय संस्कृतीच्या विरोधात काम करतेय.