मुंबई : राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांचे प्रेम जगजाहिर आहे. आदिलच्या येण्याने राखीचं आयुष्यच बदलून गेलं असं म्हणता येईल. नुकताच या दोघांचा म्युझिक व्हिडिओही रिलीज झाला असून, त्याबाबत राखी सावंतने एक धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिलच्या आयुष्यात एंट्री झाल्यानंतर राखी सावंतची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. आता राखी जे कपडे  कॅरी करते, ज्याला तिचा बॉयफ्रेंड आदिलही मंजूर करतो. यावरून आदिल त्याच्या गर्लफ्रेंड म्हणजेच राखीबद्दल किती सकारात्मक आहे हे स्पष्ट होतं. आदिलला राखीकडे कोणीही पाहू नये असं वाटतं.  दिलेल्या एका मुलाखतीत राखीने आदिलच्या स्वभावाबद्दलही सांगितलं आहे.


'तू मेरे दिल में रहने लायक नहीं' या गाण्यात राज सरांसोबत एक रोमँटिक सीन होता. असं  राखीने सांगितले. आदिलला याची जाणीव नव्हती. पुढे बोलताना राखी म्हणाली की, मला त्या सीनबद्दल सांगण्यात आलं होतं जिथे खलनायक येऊन माझ्यासोबत रोमान्स करेल. हे पाहून नायकाला धक्का बसेल आणि तो तुटलेल्या मनाने परत जाईल. गाण्याचं शूटिंग सुरू झालं आणि सर्व काही सांगितल्याप्रमाणे चालू होतं.


आदिलला राग आला
कारण आदिलला या सीनबद्दल काहीच माहीत नव्हतं. म्हणूनच राखीचा रोमँटिक सीन सुरू झाला आणि यानंतर   राखीसोबत रोमान्स करत असलेल्या ऑनस्क्रीन खलनायकाला आदिल मारायला गेला. खरंच असं घडलं असं राखीचं म्हणणं आहे. आदिलला राज सरांनी शांत केलं आणि त्याला समजावून सांगितलं की हे खरं नाही.


राखी आणि आदिलचं 'तू मेरे दिल में रहने लायक नहीं' हे गाणं रिलीज झालं आहे. गाण्यात राखी आणि आदिलची केमिस्ट्रीही चांगलीच पसंत केली जात आहे. या गाण्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आदिलला पाहून तो इतका चांगला अभिनय करू शकतो असं वाटलं नाही. पण जेव्हा म्युझिक व्हिडिओ आला तेव्हा त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं.


राखीच्या बोलण्यातून कळत होतं की आदिल पझेसिव्ह आहे आणि त्याच्या गर्लफ्रेंडची काळजी घेणारा आहे. पण हेही बघावं लागेल. राखीचा हा स्वभाव आदिल किती दिवस सहन करतो. आदिलचा हा राग त्यांच्या नात्याला भारी पडण्याची भीती चाहत्यांमध्ये दिसत आहे.