मुंबई : 'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटलं की, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' या सनीच्या रिमिक्स लावणीने गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बॉईज’ला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या पहिल्या भागाप्रमाणेच 'बॉईज २'मध्येही आयटम सॉंगचा तडका असणार आहे.


'तोडफोड' असे या आयटम सॉंगचे बोल असून अवधूत गुप्तेने ते संगीतबद्ध केलं आहे.



'बॉईज २' चा संवाद लेखक हृषिकेश कोळीने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिव आणि प्रसेनजीत कोसंबीचा आवाज लाभला आहे.


विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेता गिरीश कुलकर्णीचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. वाढदिवसाच्या माहोलात चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात सुवर्णा काळेची अदा पाहायला मिलत आहे.  


शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे.