मुंबई : टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलला नुकतंच हेअरलाइन फ्रॅक्चरचा त्रास सहन करावा लागला होता. या फ्रॅक्चरमुळे छवी मित्तलला खूप सूज आली असून अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर याबाबत अपडेट केलं आहे. छवीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करून शस्त्रक्रिया केलेल्या भागात तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुम्हाला सांगतो की, छवी ही ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. तिच्या अलीकडील व्लॉगमध्ये, अभिनेत्रीने हे उघड केलं आहे की, तिच्या दुखापतीनंतर हेअरलाइन फ्रॅक्चर बरं होण्यासाठी 3-4 आठवडे लागतील. इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, 'काल रात्री मला सर्जरीच्या भागात खूप सूज आली होती. हे सगळं केव्हा आणि कधी संपेल हे मला माहीत नाही. हे कधीकधी निराशाजनक आणि खूप वेदनादायक आहे, मात्र मी थांबली आहे. बायॉप्सी रिपोर्ट येणं बाकी आहे. माझ्याकडे लक्ष दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.


छवीने लिहिले- माझी सकाळही लवकरच येईल
यासोबत छवीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'काही आशीर्वाद आहेत आणि काही भयानक स्वप्नंही आहेत ज्यातून आपण सगळेजण जात असतो. मला विश्वास आहे की वाईट स्वप्नही संपतात आणि सूर्यकिरणांनी चमकणारी सकाळही येते. माझी सकाळही लवकर होईल.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर चाहते व्यक्त करत आहेत तिच्याविषयी काळजी 
छवी मित्तलच्या या पोस्टवर सोशल मीडियावर लोक तिची काळजी करताना दिसत आहेत. याचबरोबर तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्लाही देत ​​आहे. छवी 'एक छुटकी आसमान' आणि 'तुम्हारी दिशा' सारख्या शोसाठी ओळखली जाते.