कतरिना-विकीच्या लग्नानंतर कुटुंबात फूट?
कतरिना कैफ आणि विकी कौशल 2021 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले
मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल 2021 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर या कपलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कतरिनाच्या आगमनाने कौशल कुटुंबही खूप आनंदी आहे. इतकंच नाही तर सनी कौशलही तिच्या वहिनीसोबत खूप खुश दिसत आहे. सनी अनेक मुलाखतींमध्ये कतरिनाचं कौतुक करताना दिसतो.
पुन्हा एकदा सनीने आपल्या वहिनीबद्दल वक्तव्य केलं आहे. यासोबतच त्याने विकी कौशल आणि कतरिना कैफला वेगळ्या घरात शिफ्टींबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने सांगितले की, विकी त्याच्या घरापासून दूर गेला आहे असं त्याला अजिबात वाटत नाही कारण ते दोघंही आमच्या सतत संपर्कात असतात. त्याला अजिबात बदल झाल्याचं वाटत नाही.
सनीने याआधी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कतरिना कैफने लग्नानंतर त्यांच्या घरात सकारात्मकता आणली आहे. जेव्हापासून कतरिना त्यांच्या कुटुंबात सामील झाली आहे, तेव्हापासून प्रत्येकाचं जीवन खूप सकारात्मक झालं आहे. सनीच्या करिअरकडे पाहता त्याचा भाऊ विक्कीनंतर त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
सुरुवातीला सनी कौशल सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने अभिनेता म्हणूनही काम करायला सुरुवात केली. सनी कौशलने माय फ्रेंड पिंटो आणि गुंडेमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर सनशाईन म्युझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्याने अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर सनी 'गोल्ड' आणि 'भांगडा पा ले' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. गेल्या वर्षी सनीचा 'शिद्दत' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो लोकांना खूप आवडला होता. सध्या सनीचे तीन चित्रपट आहेत. 'हुड़दंग', 'मिली' आणि 'चोर निकल के भागा'.