मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्या संदर्भात देशभरात आंदोलन होत आहे. असं असताना बॉलिवूड दोन गटात विभागलं गेलं आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांनी CAA विरोधात आंदोलन केल आहेत यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना पाठींबा दिला आहे. तर काही कलाकारांनी या कायद्याकरता सरकारला पाठिंबा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अनुपम खेर यांनी एक संदेशपर व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी 'माझ्या प्रिय भारताच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करणं तुमचा अधिकार आहे, पण भारताला वाचवणं हे तुमचं कर्तव्य. '



किरण खेर 2014 मध्ये चंदीगढमधून भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या रुपात लोकसभेत निवडून आल्या. त्यांनी लोकांना CAA हा कायदा सुरूवातीला समजून घेण्याचा आग्रह केला. 


तसेच अभिनेता परेश रावल यांनी CAA च्या समर्थनार्थ ट्विट केलं. ते 2014 मध्ये अहमदाबादच्या तिकीटावरून निवडून संसदेत पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना ही भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेलयांच्यासोबत केली. मोदी कधीच भारताला विखरू देणार नाही. त्यांनी भाजप सरकारचे समर्थन केले आहे. तसेच फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अशोक पंडीत यांनी CAA चं समर्थन केलं. 



तर दुसऱ्या बाजूला फरहान अख्तर, मनोज वाजपेयी, अनुराग कश्यप, हुमा कुरैशी, ऋचा चड्ढा, अली फजल, शबाना आजमी, कबीर खान, स्वरा भास्कर, सुशांत सिंह आणि सिद्धार्थ यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे. यामधील अनेक कलाकारांनी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग देखील घेतला.