सैफ शाहरूखला का म्हणाला `Male Stalker`?
असं का म्हणाला सैफ?
मुंबई : सैफ अली खान पुन्हा एकदा नव्या कामासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स'च्या 2 यशस्वी सिझननंतर सैफ आगामी सिनेमा 'लाल कप्टान'साठी उत्सुक आहे. 'लंगडा त्यागी' नंतर सैफ अली खान 'नागा साधू' या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे.
कामाव्यतिरिक्त सैफ बॉलिवूडमध्ये स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. 'लाल कप्टान'च्या प्रमोशनवेळी सैफने एका मुलाखतीत आपलं 'मेल स्टॉकर' (male stalker) बद्दल आपलं मत मांडलं. बॉलिवूड रोमँटिक आणि मेल स्टॉकरने व्यापलं असल्याचं वक्तव्य केलं आहे.
या मुलाखतीत सैफने बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानला 'मेल स्टॉकिंग' शैलीतील सिनेमा करणारा म्हणून संबोधलं. 'मेल स्टॉकर' ही भारतीय सिनेमाची शैली झाली आहे. पुढे तो असंही म्हणाला की, शाहरूख खानने स्टॉकर म्हणजे सुरूवातीच्या काळात मुलींच्या मागे धावणारे रोल करून आपल्या करिअरची सुरूवात केली.
यामध्ये त्याने 'रांझना' सिनेमातील धनुष आणि 'डर' सिनेमातील शाहरूख खानची तुलना केली. तसेच सैफने पुढे आश्चर्य देखील व्यक्त केलं की, अशा कॅरेक्टरवर सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
तसेच या मुलाखतीत सैफने बॉलिवूडमधील एक कटू सत्य समोर आणलं. बॉलिवूडमध्ये हॉलिवूडला खूप कॉफी केलं जातो. पुढे तो म्हणाला की, आपण प्रेक्षकांना आपल्याला काय हवं हे देतो. आणि हे सर्व कॅरेक्टर बाहेरून कॉपी केलेले असतात.
पुढे तो म्हणाला की, शाहरूख खानचा लोकप्रिय सिनेमा 'बाजीगर' हा 1991 वर्षातील 'ए किस बिफोर डायिंग' (A Kiss Before Dying) या हॉलिवूड सिनेमावरून प्रेरित आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेमा 'बाजीगर' हा काही भारताची ओरिजनल कलाकृती नाही.
सैफच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'लाल कप्तान' हा सिनेमा 18 ऑक्टोबर 2019 रोजी रिलीज होत आहे. तसेच तब्बूसोबत 'जवानी जानेमन' सिनेमात दिसणार आहे.