`मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात!` पापाराझ्झीवर भडकली Nora Fatehi
Nora Fatehi : नोरा फतेही हिच्या एका विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात, फोटो क्लिक करतात, एवढंच नाही तर व्हिडीओ रेकॉर्ड करतात.
Nora Fatehi on Paparazzi : अभिनेत्री नोरा फतेही तिच्या विधानांमुळे कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याशिवाय ती पापाराझींमध्ये लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. पण पापाराझींच्या वृत्ती बद्दल तिने वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. तिने नुकताच एका मुलाखतीत पापाराझी यांच्या संस्कृतीबद्दल भाष्य केलं. (camera zooms in on my body parts on purpose Nora Fatehi up on paparazzi culture)
'मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर...'
नोरा म्हणाली की, पापाराझी कॅमेरा ज्याप्रकारे माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात, जसं की त्यांनी यापूर्वी असा नितंब कधीही पाहिला नाही. हे केवळ माझ्यासोबत नाही होत तर इतर महिला अभिनेत्रीसोबतही ते असंच करतात. ते सर्व प्रायव्हेट पार्ट्सवर आवश्यक नसतानाही कॅमेरा झूम इन करुन पाहतात. अनेक वेळा लक्षात आलंय की, काही गरज नसताना ते कॅमेरा झूम करतात. मग ते नेमके कशावर फोकस करत आहेत असा प्रश्न पडतो?
'त्यांचा हेतू चुकीचा असू शकतो..!'
अभिनेत्री पुढे म्हणते की, देवाने मला सुंदर शरीर दिलं आहे आणि याचा मला अभिमान आहे. मला याची अजिबात लाज वाटत नाही, असंही ती म्हणाली. त्यामुळे पापाराझींच्या या कृत्यामागे वाईट हेतू असल्याची शक्यता तिने बोलून दाखवली. त्यात मी प्रत्येकाची कॉलर धरून धडा शिकवू शकत नाही. 'मी जशी आहे तशीच राहते, चालते आणि मी माझ्या शरीराला घेऊन कंफर्टेबल आहे.'