फोटोतल्या बर्थडे पार्टीत आहेत 4 स्टार कीड्स; तुम्ही स्पॉट करू शकता?
Star Kids at Birthday Party: सध्या सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे स्टारकीडसची. त्यांच्यात एक वेगळीच स्पर्धा लागलेली असते असं म्हणतात. त्यातून त्यांच्यातील याच आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्हाला माहितीये का की आज जरी त्यांच्यात चांगला चित्रपटांवरून स्पर्धा असली तरीसुद्धा हे स्टारकीड्स एका पार्टीत अनेकदा त्यांच्या लहानपणी एकत्र पार्टीत दिसले आहेत.
Star Kids in Birthday Party: बॉलिवूडमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे मोठमोठ्या स्टारचे स्टार कीड्स हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या अभिनयामुळे तर कधी त्यांच्या आऊटफिटमुळेही ते चर्चेत असतात. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जाते. त्यातून त्यांच्या अनेकदा नव्या गोष्टी या अनेकदा ट्रेण्ड होताना दिसतात. परंतु स्टार कीड्स हे आज त्यांच्या चित्रपटांमुळे आपल्या परिचयाचे जरी असले तरीसुद्धा त्यांच्याबद्दल अनेकदा हे लिहिलं आणि बोललं जातं आणि हे काही आत्ताच नव्हतं तर फारच जुनं आहे. एकेकाळी तर हे स्टार कीड्स एकमेकांच्या बर्थडे पार्टीलाही हजेरी लावत होते. त्यामुळे त्यांची कायमच चांगली चर्चा रंगलेली होती. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यात अशा एका लोकप्रिय स्टारकीडच्या बर्थडे पार्टीला अनेक स्टारकीड्स आपल्या आईवडिलांसोबत जमले आहेत.
त्यामुळे हा फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की ही एक बर्थडे पार्टी आहे आणि हा फोटो साधारणपणे 1990s च्या दशकातला आहे. त्यामुळे यावेळी अशाच एका लोकप्रिय सुपरस्टारच्या मुलाचा वाढदिवस हा साजरा केला जातो आहे आणि त्यासाठी इतर सुपरस्टारची मुलंही त्याच्या बर्थडे पार्टीला हजर आहेत. ती या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे स्टारकीड्स नक्की आहेत तरी कोण? त्यातून तुम्हाला या फोटोतून तुम्हाला त्यांना स्पॉट करता येईल का? कदाचित तुम्हालाही त्यांना या फोटोतून शोधणं कठीण जाईल कारण ते आता इतके मोठे झाले आहे की तुम्हाला आता कदाचित त्यांना ओळखणंही मुश्किल होऊन जाईल.
हेही वाचा - बॅकलेस ब्लाऊज घालून समोर दीपिका; कोकिलाबेन अंबानी यांची 'ती' रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद
तुम्ही या फोटोत पाहू शकता की ही लहान मुलं अगदी त्या काळातील लहान मुलांच्या पेहेरावात आहेत. सोबतच या बर्थडे पार्टीमध्ये चॉकलेट्स, टॉफीज, केक्स, कोल्डड्रिंक्स, चमचमीत स्नॅक्स दिसत आहेत. यावेळी घरात सेलिब्रेशन असल्यानं सगळं घर सजवलं आहे. यावेळी केक कटिंग सुरू आहे असं फोटोतून समजून येते आहे आणि बर्थडे गर्लला तिचे वडील केक कापण्यासाठी मदत करत आहेत. तुम्हाला अजूनही ओळखता आलं नसेल तर आम्ही सांगतो की हे स्टारकीड्स कोण आहेत.
डावीकडून अर्जून कपूर, रिया कपूर, सोनम कपूर, रणबीर कपूर
यावेळी या फोटोत अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांची मुलगी रिया कपूरला कडेवर घेतले आहे. सोबतच त्यांच्या खाली सोनम कपूर आहे. तिच्या बरोबर पाठीमागे वर पाहत उभा असलेला मुलगा म्हणजे रणबीर कपूर आहे. तर कोपऱ्यात उभा असणारा मुलगा हा अर्जून कपूर आहे.