मुंबई : सोशल मीडियावर सेलिब्रेटिंचे लहानपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल होत असतात. अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे.  90 च्या दशकातील (90's Top Actresses) अशाच एका सुपरस्टार अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल झालेला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीने बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम केलं आहे. इतकंच नाहीतर त्यांच्यासोबतचे हिचे चित्रपट एकदम हिट ठरले होते. तुम्हाला एक हिंट अशी आहे की, फोटोमधील अभिनेत्री कपूर कुटुंबातील दुसरी मुलगी आहे जिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. 


या फोटोत दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची बोल्ड  स्टाइल चाहत्यांनाही आवडते. ती दोन मुलांची आई आहे, पण फिटनेसच्या बाबतीत ती तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकते. 


तिच्या डोळ्यातील खोडकरपणा, गोंडस स्मित आणि लाल बिकिनी असलेली बबली बेबने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत.  तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिला फॅशन दिवा असंही म्हणतात. आता ती स्वतः दोन मुलांची आई आहे. तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती 476 कोटींची मालकीण आहे. ही चिमुकली आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.


एवढ्या इशाऱ्यांनंतरही जर तुम्ही या मुलीला ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची बेबो करीना कपूर आहे. ती बालपणी जितकी खोडकर होती, तितकीच आजही ती बिंधास्त आणि बोल्ड आहे.


करीना कपूर चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचं नाव शाहिद कपूरसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, 2012 मध्ये तिने सैफ अली खानला जीवनसाथी म्हणून निवडलं. लग्नाच्या पाच वर्षानंतर करिनाने तैमूरला जन्म दिला आणि 2021 मध्ये मुलगा जेहचा जन्म झाला.


वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करिनाने 2000 साली 'रिफ्युजी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती. या वर्षी ती हंसल मेहताच्या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहरच्या 'तख्त'मध्येही ती झळकणार आहे.