मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय, पती अभिषेक बच्चन आणि मुलगी ऐश्वर्या राय यांच्यासोबत कान्स महोत्सवाला गेली आणि तिथं तिच्या फॅशनचा जलवा साऱ्या जगानं पाहिला. कान्सला हजेरी लावल्यानंतर बच्चन कुटुंबीय भारतात परतले. पण, त्यांचं स्वागत फारसं चांगलं झालं नाही. (Aishwarya rai bachchan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायदेशी परतताच त्यांना एका जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी त्यांना कळली. ही व्यक्ती होती, कॉस्च्युम डिझायनर अकबर शाहपूरवाला यांच्या निधनाची. 


एका खास व्यक्तीच्या निधनातून सावरतानाच बच्चन कुटुंबीयांना लगेचच आणखी एका खास व्यक्तीच्या आनंदातही सहभागी व्हावं लागलं. 


ही खास व्यक्ती म्हणजे खुद्द ऐश्वर्याची आई. ऐश्वर्यानं नुकताच तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर तिनं या सेलिब्रेशनदरम्यानचे काही फोटोही शेअर केले. 


आईचा 71 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून ऐश्वर्या कान्समधूनही लवकरच परतली. इथं येताच तिनं कुटुंबाला प्राधान्य दिलं. आजीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची लेक, आराध्यासुद्धा आजीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली. (Cannes 2022 Bollywood Actress Aishwarya rai abhishek bachchan party mothers birthday )


ऐश्वर्यानं तिच्या या सेलिब्रेशनमध्ये तिच्या वडिलांनाही समाविष्ट करुन घेतलं. वडिल आज आपल्यात नसले तरीही हे कुटुंब फोटो काढताना त्यांना कधीच वगळताना दिसत नाही. थोडक्यात प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये वडिलांचीही लेकिला साथ असते.