Chris Evans Wedding: भारतातही हॉलिवूड चित्रपटांचा वेगळा चाहता वर्ग आहे. हॉलिवूडमधील अॅक्शनपट त्यातील हिरो यांनी भारतीय प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. हॉलिवूडपटातील एक सर्वात लोकप्रिय असा मार्वेल चित्रपटांनी तर तरुणाईला अशरक्षा वेड लावलं आहे. मार्वेलचे सर्व चित्रपटांना तरुणांनी डोक्यावर घेतलं आहे. तर, त्यातील हिरो-हिरोईन हे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.  कॅप्टन अमेरिका याचे फॅनतर जगभरात आहेत. लाखो मुली त्याच्या चाहत्या आहेत. कॅप्टन अमेरिका म्हणजेच अभिनेता क्रिस इव्हान्स लग्नबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड अल्बा बेपिस्टासोबत त्यांना लग्न केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिस इव्हान्स आणि अल्बा बेपिस्टा यांनी 9 सप्टेंबर रोजी मॅसाचुसेट्स येथे लग्न केले आहे. या सोहळ्याला फक्त जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती. 10 सप्टेंबररोजी अमेरिकेतील काही वृत्तसंस्थांनी ही बातमी दिली आहे. क्रिसने 16 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लग्न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. क्रिस आता 42 वर्षांचा आहे तर अल्बा फक्त 26 वर्षांची आहे. लग्नासाठी दोघांचेही  कुटुंब आणि जवळचे मित्र मैत्रिण उपस्थित होते. कोण आहे अल्बा बेपिस्टा हे जाणून घेऊया. 


लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असतानाच काही वृत्तसंस्थांनी क्रिस आणि अल्बासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. क्रिस आणि अल्बा यांनी नेटफ्लिक्सची सीरिज वॉरियर ननमध्ये एकत्र काम केले होते. दोघेही दोन वर्षांपासून एकत्र आहेत. यआधाही त्यांनी सिक्रेट Engagement केल्याची माहिती समोर आली होती. पहिल्यांदा नोव्हेंबर 2022मध्ये दोघे डेट करत असल्याची चर्चा समोर आली होती. न्यूयॉर्कमध्ये दोघांनाही फिरताना पाहिलं गेलं होतं. 



तर, जानेवारीमध्ये क्रिस आणि अल्बा दोघांनी आपल्या नात्याची कबुली इन्स्टाग्रामवर दिली होती. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ते एकमेकांना बेबी व बेब बोलताना दिसत आहेत. तर, व्हिडिओत त्यांचा डॉग डोजरदेखील दिसत आहे. त्यानंतर क्रिसने व्हॅलेन्टाइनला एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. 


कोण आहे अल्बा


Alba Baptista चा जन्म 10 जुलै 1997 साली झाला आहे. ती एक पोर्तुगाल अभिनेत्री असून जार्डिन्स प्रोइबिडोस सीरीजमधून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. ए इम्पोस्टोरा', 'फिलहा दा लेई', 'ए क्रिआकाओ' और 'जोगो डुप्लो' मध्ये काम केले होते. 2020 ते 2022 पर्यंत तिने नेटफ्लिक्स सीरीज वॉरियर ननमध्ये काम केलं होतं.