मुंबई : बॉलिवूडचा गायक मिका सिंह यांच्या घरी लाखोंची चोरी झाल्याची माहिती मिळतेय. मिकाच्या ओशिवरा स्थित अपार्टमेंटमधून ३.२५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची चोरी झालीय. या घटनेची ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये रविवारी तक्रार दाखल करण्यात आलीय.गेल्या काही दिवसांपूर्वी, विमानाचा बिझनेस क्लास बुक करून श्रीमंतीचं प्रदर्शन करणारा मिका सिंग चर्चेत आला होता. परंतु, या घटनेमुळे मात्र मिकाला चांगलाच धडा मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी ३-४ वाजल्यादरम्यान ही घटना घडलीय. यानंतर मिकाच्या घरी आल्या-गेलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्येही ताब्यात घेतलंय. 


उल्लेखनीय म्हणजे, गेल्या १० वर्षांपासून मिकासोबत काम करणारा २७ वर्षीय अंकित वासन मात्र या दिवसापासून गायब झालाय. अंकित मिकाचे प्रोजेक्ट आणि लाईव्ह शोचं काम पाहत होता. पोलिसांना त्याच्यावरही संशय आहे. पोलिसांनी अंकितविरुद्ध कलम ३८२ नुसार गुन्हाही दाखल केलाय. 


अंकित मिकाच्या अगदी जवळचा व्यक्ती म्हणून परिचित होता. त्यामुळे त्याच्या येण्याजाण्यावर कुणीही संशय घेतला नाही... आणि याचाच फायदा अंकितनं घेतल्याचा पोलिसांचा संशय आहे.