Casting Couch in Bollywood Film industry : रोल... कॅमेरा...ऍक्शन... त्यानंतर मिळणाऱ्या प्रसिद्धी, संपत्तीआधी कलाकारांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजे झगमगत्या विश्वातील कास्टिंग काऊच. काही वर्षांपूर्वी कलाकार मोकळ्यामनाने यावर बोलू शकत नव्हते, पण आता त्यांना आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतो. या रंगीबेरंगी विश्वात फक्त अभिनेत्रींनाच नाही तर, अभिनेत्यांना देखील कास्टिंग काऊचचा सामना कराला लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक भयानक अनुभव पद्मावत (Padmaavat) फेम अभिनेता सार कश्यपने (Saarrh Kkashyap) सांगितला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे. जेव्हा सार एका कास्टिंग डायरेक्टरला भेटला होता.  (Saarrh Kkashyap work)



कास्टिंग काऊचबद्दल अभिनेता म्हणाला, 'माझ्या लक्षात आहे. एका कामा निमित्त मी कास्टिंग डायरेक्टरला भेटलो होतो. त्या  व्यक्ती मला सांगितलं इंडस्ट्रीमध्ये रहायचं असेल तर, गुड लूक्स, अभिनय आणि कौशल्यासोबतच आणखी एक कौशल्य असणं फार गरजेचं आहे.' (casting couch in bollywood)


'त्या डायरेक्टरने मला घरी बोलावलं. मी त्याच्या घरी गेलो. सुरुवातील कामाबद्दल गप्पा झाल्या. त्यानंतर त्याने मला प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितलं. तेव्हा काही क्षणासाठी मला काही कळालं नाही. मी त्या व्यक्तीला सांगितलं मला ऑडिशनवर लक्ष द्यायला अधिक आवडेल. त्यानंतर मी त्याच्या घरातून बाहेर पडलो...' (how to avoid casting couch in bollywood)


अनेक मालिकांचा प्रसिद्ध चेहरा 
‘बडी दूर से आए हैं’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘बाल कृष्ण’ अशा अनेक मालिकांमध्ये सार कश्यपने महत्त्वाची भूमिका साकारली. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो.