मुंबई : ''कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुण'' हा शो दिवसेंदिवस लोकप्रिय झाला. मराठीतील नंबर वन असलेला ही वेब सिरीजमध्ये आता धक धक गर्ल माधुरी दीक्षितने देखील हजेरी लावली आहे. या खास अभिनेत्रीच्या उपस्थितीने अमेय आणि निपुण यांच्या शोचे चांद चांद लागले आहेत. 25 मे रोजी माधुरी दीक्षितचा 'बकेट लिस्ट' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमांत माधुरीसोबत सुमित राघवन देखील आहे. या सिनेमाचं प्रमोशन उत्तम चाललेलं असताना माधुरीची कास्टिंग काऊचमध्ये खास उपस्थिती असल्यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'बकेट लिस्ट'मधून माधुरी मराठीत पदार्पण करत आहे. मराठीतील प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमाला करण जोहरचं बॅनर असून या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तसेच माधुरी आणि रेणुका शहाणे तब्बल 24 वर्षांनी यासिनेमांत आपल्याला एकत्र दिसणार आहेत. 


'बकेट लिस्ट'च्या सेटवर या दोघी 'हम आपके है कोन' या सिनेमातील 'लो चली मै...'' या गाण्यावर ठेका धरताना दिसल्या. हा व्हिडिओ देखील लोकप्रिय झाला होता. आता या सिनेमाची उत्सुकता वाढली असून माधुरी आणि सुमित आता कास्टिंग काऊच या शोमध्ये देखील आले होते.