मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशंत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपावण्यात आली आहे. अखेर बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी आणि बिहार सरकारकडून केली जात होती. यावेळी सुशांत आत्महत्या प्रकरणातील वकील  विकास सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले, 'आज मोठा दिवस आहे. या युद्धामध्ये न्यायाची वाट पहावी लागली. पण विजय अखेर सत्याचा झाला आहे. न्यायालयाने आज मोठा निर्णय सुनावला आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने सीबीआयच्या तपासणीस मान्यता दिली. तसेच यासंदर्भातील प्रत्येक खटल्याची चौकशीही न्यायालयाने  सीबीआयकडे सोपविली आहे.'


म्हणजेच आता सुशांतसोबतच दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाची चौकशी देखील सीबीआय करणार असल्याचं याठिकाणी स्पष्ट होत आहे. बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. 


बिहार पोलिसांचा अर्ज वैध असल्याचं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलंय. मुबंई पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावं. तसंच सर्वाच्च न्यायालयाकडून केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.