Celebrity real name: शेक्सपियरने म्हटलं होत , नावात काय आहे ? हे वाक्य आज जगभरात प्रसिद्ध आहे. पण आपल्या प्रत्येकाला आपलं नाव , आडनाव सर्वकाही फार प्रिय असतं. आपल्याला आपल्या नावावरून ओळखलं जात. पण तुम्हाला माहित आहे सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपलं खरं नाव जगासमोर आणलंच नाहीये. हो तुम्हीसुद्धा तुमच्या या लाडक्य कलाकारांना या नावाने ओळखता ते त्यांचं खरं नाव नाहीये. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ना कोण आहेत हे कलाकार ? आणि का बरं त्यांनी नावात बदल केला असेल.  
सिनेसृष्टीत सध्या हा ‘शॉर्टकट’ नावाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पाहूयात अशाच काही कलाकारांची  खरी नावं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता सुभाष – मराठीतील अतिशय जाणती अभिनेत्री, अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये चरित्र अभिनय करून आज मराठी आणि हिंदी सिनेमात आपली वेगळी ओळख (amruta subhash) निर्माण केली आहे. तुम्हाला माहित आहे का तिचं लग्नाआधी नाव होतं, अमृता ढेंबरे. लग्नानंतर तिचं नाव अमृता सुभाष कुलकर्णी असं झालं. पुढे मग तिने अमृता सुभाष हेच नाव लावायला सुरवात केली. 


रसिका सुनील –  शनाया हे पात्र महाराष्ट्रात क्वचितच कोणाला माहित नसेल. झी मराठीवरील (zee marathi) माझ्या नवऱ्याची बायको या सीरिअलमधून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री. उत्तम अभिनयाच्या जोरावर आज तिने इंडस्ट्रीमध्ये  स्वतःचा  वेगळा ठसा उमटवला आहे. रसिकांचं पूर्ण नाव आहे रसिक सुनील धाबडगावकर.  तिचं आडनाव खूप मोठं असल्याने ती तिचं नाव आणि पुढे वडिलांचं नाव लावते.


सायली संजीव – काही दिया परदेस फेम सायली संजीव जी सध्या ऋतुराज गायकवाडसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे चांगलीच प्रसिद्ध आहे, ती सुद्धा आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लावते, आणि तिची खरं नाव आहे सायली संजीव चांदसारकर.


ललित प्रभाकर –  लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा ललित प्रभाकर याच पूर्ण नाव आहे ललित प्रभाकर भदाणे. 


भाग्यश्री – ‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर सिनेमातून सर्वांसमोर आलेली मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री हीचं खरं नाव आहे भाग्यश्री पटवर्धन, सांगलीच्या पटवर्धन घराण्याची ती वंशज आहे.  


अजय-अतुल –  आपल्या संगीत आणि गाण्यांनी जगाला सैराट करून सोडलेल्या अजय अतुलच्या (ajay-atul) जोडीने सुद्धा आपलं आडनाव लावलं नाही.