मुंबई : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने अशी एक चिंताजनक बाब उघड केली आहे. चाहतने सांगितलं आहे की, ती सध्या एक कठीण टप्प्यातून जात आहे. आई असल्याने तिला काम मिळत नाही. तिने आपलं हे दुख: सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुक आणि ट्विटर वर खुलासा
काम न मिळत असल्यामुळे मोठा खुलासा चाहतने गुरुवारी केला आहे. कायमच ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिवअसते. म्हणूनच, तिला वाटत असणाऱ्या भितीचं वर्णन करण्यासाठी तिने याच व्यासपीठाची मदत घेतली आहे. तिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सांगितलं आहे की, आई असल्यामुळे कोणीही तिला काम देत नाही. ज्यामुळे तिला अडचणींना सामोर जाव लागत आहे. 



चाहत आहे दोन मुलींची आई 
दोन मुलींची आई असलेल्या चाहतने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मी एक अविवाहित आई आहे. पण मी आई असल्याने इंडस्ट्रीत बरेच गैरसमज होत आहे. मी माझ्या दोन मुलांना थोड्याफार पैशांमध्ये वाढवत आहे. तसंच निर्माते मला आई असल्याबद्दल जज करतात. मी पूर्वीसारखं ताकदीने काम करु शकेन का? अशी शंका निर्मात्यांना वाटते. मात्र सत्य हे आहे की, आई बनणं आपल्याला नेहमीपेक्षा अधिक सामर्थ्यवान बनवतं कारण, आपण आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी काम करत असतो. कामाच्या ऑफर संपल्या आहेत परंतु मी एक कमकुवत व्यक्ती किंवा कलाकार नाही. मी प्रत्येक बाबतीत अधिक कणखर आणि फिटर आहे. जे आहे ते समोर ठेवा.''



व्हायरल होतेय पोस्ट
चाहतची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील बरेच लोक या पोस्टवर आपला प्रतिक्रिया देत आहेत. याचबरोबर एका मुलाखतीत बोलताना चाहत खन्ना म्हणाली की, जेव्हा विवाहित अभिनेत्री, ती देखील एक आई असते, जेव्हा तिला कास्ट करण्याचा प्रश्न येतो तेव्हा निर्माते दोनदा विचार करतात. मी जोहर आणि अमिरा या दोन मुलींची आई आहे. मी दुप्पट कष्ट करून काम करण्यास तयार आहे, परंतु मला कोणतीही ऑफर देत नाही. चहत खन्ना नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. 'बडे अछे लगे हैं' आणि 'कुबूल है' यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.