मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ अशाही असतात ज्या सर्वांचं लक्ष वेधतात. असाच एक व्हिडीओ सध्या कमाल व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पाहणारे अवाक् होत ही बिग बींचीच नात असल्याचा दावा करत आहेत. (Viral Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या मुलीचाच हा व्हिडीओ असल्याचं म्हणत तो तुफान शेअर केला जात आहे. 


व्हिडीओमध्ये एक मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) च्या 'अतरंगी रे' (Atrangi Re) चित्रपटातील 'चकाचक' या गाण्यावर ठेका धरत आहे. 


साराप्रमाणंच या मुलीनं हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. शिवाय ती गाण्याप्रमाणेच ठेकाही धरत आहे. 


व्हायरल होणाऱ्या या मुलीची उंची, तिची अदा आणि हेअरस्टाईल पाहता अनेकांनाच ही अमिताभ बच्चन यांची नात असल्याचा भास झाला. 


पण, मुळात ती आराध्या नाहीये. @tania_and_sony या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 


अकाऊंटवर गेलं असता आई- मुलीची एक जोडी त्यांचे डान्स परफॉर्मन्स या माध्यमातून नेटकऱ्यांच्या भेटीला आणत असल्याचं लक्षात येत आहे. 


दरम्यान, या मुलीचा चकाचक डान्स इतका सुरेख आहे की खुद्द सारा अली खानही तो शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकलेली नाही. 


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या डान्सचे अनेक रिल्स पाहायला मिळाले. प्रत्येकानं आपल्या परिनं साराच्या गाण्यावर ठेका धरला. 


मुख्य म्हणजे खुद्द सारानं चाहत्यांचे बहुतांश व्हिडीओ तिच्याही अकाऊंटवरुन शेअर करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.