मूंबई : चला हवा येऊ द्या, या झी मराठीवरील मालिकेतील कलाकरांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण केली आहे. त्यात भाऊ कदम म्हणजे सर्वांचा आवडता आभिनेता. जो लोकांना मनापासून हसायला भाग पाडतो. अशा अष्टपैलू कलाकाराला अभिनयाची आवड कुठून लागली? असे विचारले असता त्याने जे उत्तर दिले, ते ऎकूण तुमचा विश्वासच बसणार नाही. भाऊ म्हणाला की, त्याला स्टेजवर जायला भीती वाटायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊ म्हणाला, "वडाळ्याला राहात असताना प्रत्येक सणांमध्ये समारंभ असायचे त्यामध्ये एकांकीका, नाटकं व्हायची. हे बघायला मस्त वाटायचं परंतू स्टेजवर जायची हिंम्मत व्हायची नाही. नंतर विचार केला की, हे सगळ शिकायला हवं लोकांच्या समोर जायला हवं. मग कॅालेजमध्ये असताना एकांकीकेत भाग घेतला. काय करतोय, कसं करतोय हे समजायचे नाही, कारण त्यातला फारसा अनुभव नव्हता. परंतु त्यात बक्षीस मिळालं, त्यामुळे मग हे करण्याचं प्रोत्साहन मिळालं आणि कॅान्फीडन्स ही वाढला. घरच्यांकडून या बद्दल शाबासकी मिळाली नाही, कारण असं काही करिअर असतं याची त्यांना कल्पना नव्हती."


भाऊने पुढे त्याच्या करिअरमध्ये चांगल्या मित्रांचाही वाटा असल्याचे सांगितले, तो म्हणाला, "चांगले मित्र मिळाले, मग हा प्रवास सुरु झाला. मग 'करुन गेलं गाव','यदाकदाचीत' अशी व्यवसायिक नाटकं केली, आणि मग इथे आलो.


'फु बाई फु' च्या सेटवर काम केलं."  त्यामध्ये भाऊने झी मराठीचेही आभार मानले. भाऊच्या म्हण्याप्रमाने त्याचं करिअर घडवण्यामध्ये झी मराठीचा मोठा वाटा आहे. झी ने संधी दिली म्हणून इथपर्यंत पोहचू शकलो, असे त्याचे मत आहे.



चला हवा येऊ द्या, या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.