Bharat Ganeshpure: `चला हवा येऊ द्या` फेम भारत गणेशपुरे यांना मातृशोक!
Bharat Ganeshpure Mother Death: `चला हवा येऊ द्या` या महाराष्ट्राच्या (Chala Hawa Yeu Dya) लोकप्रिय मालिकेतून मराठी मनाला भरभरून आनंद देणारे अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure Comedy) यांच्या आईचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Bharat Ganeshpure Mother Passes Away: गेली अनेक वर्ष मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या आई मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे आज (9 मार्च) सकाळी वृद्धपकाळानं निधन झाले आहे. त्या 83 वर्षांच्या (Bharat Ganespure Mother Dies) होत्या. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. अमरावतीतील रहाटगाव (Amravati) येथील स्मशानभुमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे आणि त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारत यांच्या आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे. भारत यांच्या आई मनोरमा यांना चार अपत्ये होती. त्यापैंकी एका मुलाचं व एका मुलीचं यापुर्वी निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात आता भारत गणेशपुरे, त्यांचा भाऊ मनीष, सुना आणि नातवंडं असा (Bharat Ganeshpure Family) परिवार आहे. (Chala Hawa Yeu dya fame bharat ganeshpure mother passed away entertainment news marathi)
भारत गणेशपुरे यांचे भाऊ मनीष गणेशपुरे यांच्या रहाटगाव येथे असलेल्या राहत्या घरी मनोरमा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भारत मुंबईहून अमरावतीला रवाना झाले. दिशा ग्रुपचे सचिव स्वप्निल गावंडे आणि दिग्दर्शक विराग वानखेडे यांच्या सहकार्यानं भारत यांच्या आईचे नेत्रदान करण्यात आले. त्यांनी त्यांना यासाठी प्रेरित केले.
कलाकारांच्या आयुष्यात असे क्षण हे येतच असतात परंतु कलाकाराला त्यानूसार स्विच ऑन आणि स्विच ऑफ व्हावे लागते. अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) हिनं एका कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांना जेव्हा त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा कशाप्रकारे दुसऱ्या क्षणी ते कलाकाराच्या भुमिकेत शिरले याची आठवण करून देत भारत गणेशपुरे यांच्या जिद्दीचे तिनं कौतुक केले होते.
आईच्या आठवणी
भारत गणेशपुरे हे आपल्या आईच्या खूपच जवळ होते. त्यांच्या निधनानं भारत गणेशपुरे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यापुर्वीही आपल्या आईबद्दल बोलताना ते भावूक झाले होते. दोन वर्षांपुर्वी 'झी मराठी अवॉर्ड' या कार्यक्रमात त्यांच्या आणि त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला होता. तेव्हा आपल्या आईबद्दल बोलताना भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure on his Mother) यांनी अनेक आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या होत्या. त्याचसोबतच त्यांच्या आई यांनाही भारत गणेशपुरे यांच्या मेहनतीचे, अभिनयाचे आणि विनोदाचे सर्वांसमोर भरभरून कौतुक केले होते.
संघर्ष, मेहनत आणि यश
2014 साली सुरू झालेल्या 'चला हवा येऊ द्या' (Bharat Ganeshpure in Chala Hawa Yeu Dya) शोपासून भारत गणेशपुरे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांच्या विदर्भ स्टाईल भुमिकांचे सगळीकडूनच कौतुक करण्यात आले होते. भारत गणेशपुरे यांचा संघर्षही सोप्पा नव्हता. अपार कष्ट आणि मेहतनीच्या जोरावर ते इथपर्यंत पोहचले आहेत. आज त्यांच्या मातोश्री त्यांच्यापासून हरपल्या आहेत.