मुंबई : ''चला हवा येऊ द्या'' या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत. (व्हीडिओ पाहाण्यासाठी बातमीच्या शेवटी  जा)


कुशल बद्रिके याचा आईच्या वाढदिवसाचा किस्सा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या वाढदिवसाचा किस्सा असं कुशलला विचारले असता, एक सुंदर अनुभव आणि विचार कुशलने शेअर केला. त्याच्या मते प्रत्येक आई- वडिलांच्या आयुष्यात असा सुखद क्षण यावा, असे त्याला वाटते.


कुशलने आईच्या वाढदिवसाचा किस्सा सांगताना म्हंटले की, "मी ठाण्याला शिफ्ट झालो तेव्हा तिकडे आईची मैत्रीण तिला भेटायला आली ,त्या दोघी जणी जवळ जवळ 25 वर्षांनी एकमेकींना भेटल्या.


मैत्रीणीला भेटल्यावर आईला इतका आनंद झाला ते पाहून मी विचार केला की, आपण आईच्या दुसऱ्या जुन्या मित्र-मैत्रिणींना पण भेटायला बोलवायचे ठरवले. मग आईच्या त्या मैत्रीणीला सांगून दुसऱ्या मित्र-मैत्रीणींचा कॅानटॅक्ट काढला आणि सगळ्यांना एकत्र आणले.



ते आईचे इतके जुने मित्र-मैत्रिणी होते की, ते जवळ जवळ 45 वर्षे एकमेकांना भेटले नसतील. मग मी आणि माझ्या भावाने विचार केला की आईचे गेटू गेदर करायचे. त्या दिवशी सगळ्यांना एकत्र पाहूण आईला खूप आनंद झाला आणि तो दिवस आमच्या सगळ्यांसाठी खुप सुखद आणि मोठा दिवस होता.