मुंबई : कुशल बद्रिकेने नाटकात भाग घेण्यासाठी जे केलं, त्याचा तुम्ही विचार देखिल करू शकणार नाही. खरे तर कुशलने कॉमर्समधून आपले Graduation पूर्ण केले आहे. परंतू तुला अभिनय करायचे होते मग तू कॉमर्स का केलेस? असा प्रश्न कुशलला विचारला असता. त्याने सांगितले की, "माझ्या वडिलांना खात्री नव्हती की, मी अभिनेता बनू शकेन, म्हणून मग त्यांनी मला कॉमर्सला ऍडमिशन घ्यायला सांगितले. तसेच त्यांनी एक पर्याय सुचवला की, तुला जर कॉमर्समधून जमले नाही, तर मग तू आर्टसला जा. पण तू आर्टस घेऊन कॅामर्स घेऊ शकत नाहीस. म्हणून मग मी कॅामर्सला गेलो. तसे कॅामर्स सोपं आहे."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं पर्यंत तर सगळं ठीक आहे, पण खरी गंमत तर पुढे आहे. कुशल म्हणाला, त्याला एकांकिकेत भाग घेता यावा म्हणून त्याने परत आर्टसला ऍडमिशन घेतले आणि एकंकीका केली. ती होताच त्याने आपले ऍडमिशन परत काढून घेतले. एखादा कलाकार आपली कला जोपासायला काही ही करु शकतो हे मात्र कुशलने सिद्धं केलं आहे.



चला हवा येऊ द्या, या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.