COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांच्या पसंतीचा शो आहे. यामध्ये डॉ निलेश साबळे आणि संपूर्ण टीम महाराष्ट्रासह सगळ्यांना खदखदून हसवत आहे. मराठीतील अनेक कलाकार आपल्या सिनेमांच्या नाटकांच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर उपस्थित राहतात. आजचा सोमवारचा एपिसोड हा असाच खास असणार आहे. 


आजच्या या एपिसोडमध्ये चला हवा येऊ द्या मंचावर आपल्याला रिझल्टची लगबग पाहायला मिळणार आहे. चला हवा येऊ द्या हा मंच कायम नवनवीन गोष्टी घेऊन येत असतं. असाच आजचा एपिसोड वेगवेगळ्या रंगांनी भरलेला असणार आहे. त्याचप्रमाणे हॅम्लेट या नाटकाचा एपिसोड देखील दाखवण्यात येणार आहे. कुशल बद्रिकेने या एपिसोडमध्ये हॅम्लेट या नाटकातील महत्वाची भूमिका अगदी मजेशीर साकारला आहे. तसेच इतर कलाकारांचा देखील अभिनय देखील हसायला लावणारा आहे. 


चला हवा येऊ द्यामधील प्रत्येक पात्राने हसवण्याचा वसा घेतलेला आहे. आपल्या अभिनयातून हे कलाकार संपूर्ण महाराष्ट्राला हसवत असतात.