मुंबई : आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारी, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' अवघ्या काही दिवसातच हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला आणि त्यातील कलाकारांनी महाराष्ट्रातील नव्हे तर परदेशातीलही रसिकांच्या मनावर राज्य केले. मात्र आता दार सोमवारी निलेश  ‘कसे आहात मंडळी, हसताय ना.. हसायलाच पाहिजे..’ असे म्हणताना दिसणार नाही. कारण तुमच्या सर्वांच्या हा आवडता कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने मराठी पाऊल पडले पुढे... ही ओळ पूर्ण करून दाखवली. मराठीच नव्हे तर आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या मंचावर हजेरी लावली. कालच्या भागात कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने आता थोडसं थांबण्याची वेळ आल्याचे सांगितले. मात्र ही विश्रांती अल्प काळाची असणार आहे. काही क्षणांच्या दुराव्यानंतर ही टीम पुन्हा नवं काहीतरी घेऊन रसिकांना हसवायला सज्ज होईल. 


‘चला हवा येऊ द्या’च्या जागी ‘सा रे ग म प’ हा नवा कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यामुळे थुकरटवाडीतील विनोदांचा हा आजचा शेवटचा दिवस असणार आहे.