मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या लग्नामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. लग्नाच्या चर्चा रंगत असताना, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करत असते. तेव्हा ती रणबीरला कोणता पिझ्झा खाणार असं विचारते... तेव्हा रणबीर उत्तर देत नाही. कारण तो त्या ठिकाणी नसतोचं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चांदनी नावाची एक मिमिक्री आर्टिस्ट आलियाच्या आवाजात पिझ्झा डिलिव्हरी कंपनीसोबत विनोद करताना दिसते... आलियाची नक्कल करताना समोरचा व्यक्ती  देखील तिच्यासोबत बोलताना अडकतो... पाहा व्हिडीओ...



मिमिक्री करताना मुलीने रणबीर कपूरचे नावही घेतले. पण रणबीर त्या ठिकाणी नसतो. चांदनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलिया आणि रणबीरच्या नात्याचा एका भाग दाखवत असताना चांदनी मात्र तुफान चर्चेत आली आहे.