Chandramukhi 2 Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना राणावत सध्या भलतीच चर्चेत आहे. सध्या तिचे दोन मोठे चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यावर्षी तिचा सर्वाधिक चर्चेत असणारा चित्रपट 'इमरजन्सी' पदर्शित होतो आहे आणि सोबतच तिचा साऊथ इंडियन चित्रपट 'चंद्रमुखी' गणेश चतुर्थीला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असून सध्या या पोस्टरचीच सर्वत्र चर्चा आहे. तुम्हाला 'भुलभुलैया' हा चित्रपट माहितीच आहे. या चित्रपटाचाही सिक्वेल मागच्या वर्षी प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट हा दाक्षिणात्त्य चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक आहे. आता याच चंद्रमुखीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात आपल्याला कंगना राणावत पाहायला मिळणार आहे. सोबतच राघवा लॉरेन्सचीही यात प्रमुख भुमिका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचे पोस्टर आज प्रदर्शित झाले असून हा चित्रपट इतर प्रादेशिक भाषांमध्येही प्रदर्शित होतो आहे. त्याचेही पोस्टर प्रदर्शित झालं आहे. पी. वासू यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट येत्या गणेश चतुर्थीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहत्यांना आता या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. या पोस्टरखालीही चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो आहे याचीही आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. चंद्रमुखीचा पहिला भाग प्रेक्षकांना उचलून धरला होता. त्याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला असून हा चित्रपट आता टीव्हीवर कुठेही लागला तरीसुद्धा या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसते. या चित्रपटाचा विषय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. 


या नव्या चित्रपटातूनही काहीतरी नवा सेस्पेन्स पाहायला मिळणार असल्यानं प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहचली आहे. या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेता राघवा लॉरेन्स हा दरवाज्याच्या भोकातून आत काहीतरी पाहताना दिसतो आहे आणि त्या भोकातून आतून उजेड येतो आहे. हा चित्रपट 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात येणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्ल्याळम तसेच कन्नडा भाषेत प्रदर्शित होणार आहे. 



अद्याप कंगना राणावतचा लुक हा रिव्हिल झालेला नाही परंतु लवकरच तोही होईल. या चित्रपटातून राधिका सरथकुमार, वाडीवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सुविक्षा कृष्णन आदी स्टारकास्टही आहे. या चित्रपटाचे संगीत आरआरआरचे संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी केले आहे.