मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्लॅनेट मराठीच्या युट्युब चॅनेलवर रिलीज झालेला 'चंद्रमुखी'चा टीझर प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरला आहे.अलिकडेच दिग्दर्शनाकडे वळलेला अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक लवकरच 'चंद्रमुखी' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट – 'अजय अतुल' यांच्या संगीताची हलकिशी लकेर  आपल्याला या चित्रपटाचं गुपित कानात गुणगुणतं ठेवेल.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असणार आहे. येत्या दिवाळीत 5 नोव्हेंबर 2021 ला चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याचा मागील चित्रपट हिरकणी प्रचंड लोकप्रिय ठरला होता.  लवकरच 'न्यू नॉर्मल'चा पॅटर्न येईल...आणि येतांना 'चंद्रमुखी' हा बहु-चर्चित आणि बिग-बजेट चित्रपट घेऊन येईल !



गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु होणाऱ्या 'हिंदू संवत्सराचा' आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. 'उंचावणाऱ्या नव्या आशांचे' प्रतिक म्हणजे गुढी आणि याच गुढीच्या पलीकडून येणारी आशेची किरणं, कोरोनाच्या भीषण अनुभवांच्या पलिकडचं जग आपल्याला दाखवतील. हे ही दिवस जातील... फक्त गरज आहे संयमाची...


निर्माते अक्षय बर्दापूरकर व त्यांचा भारतातील पहिला-वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म – 'प्लॅनेट मराठी' आणि 'गोल्डन रेशो फिल्म्स' यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे 'फ्लाईन्ग ड्रॅगन' हे सह-निर्माते आहेत. 'एबी आणि सीडी', 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटांच्या पाठोपाठ आता 'चंद्रमुखी' सिनेमाच्या निर्मितीतही 'प्लॅनेट मराठी' आणि 'गोल्डन रेशो फिल्म्स' निर्माते म्हणून एकत्र आहेत. या चित्रपटाची, पटकथा आणि संवाद आहेत चिन्मय मांडलेकर यांचे. संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  अजय-अतुल चं अस्सल मातीतलं मराठमोळं संगीत आणि प्रसाद ओक चं दिग्दर्शन...!!! यामुळे या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्याचं पहायला मिळतं आहे