मुंबई : पॉर्न रॅकेट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एस्प्लेनेड न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. चार लोकांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ज्यात राज कुंद्रा, रायन थोरपे, यश ठाकूर उर्फ ​अरविंद श्रीवास्तव आणि प्रदीप बक्षी यांचा समावेश आहे. रायन थोरपे  वियान एंटरप्रायजेसचा आयटी प्रमुख आहेत. यश उर्फ अरविंद फरार आहे आणि तो सिंगापूरमध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी लंडनमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज कुंद्रासह त्याच्या साथीदारांविरोधात एक हजार 464 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात कुंद्रालाच मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. चार्जशीटमध्ये तब्बत 43 सक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज कुंद्राच्या अडचणीत दुपटीने वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 


2021 साली फेब्रूवारी महिन्यात पोर्नोग्राफी प्रकरण समोर आलं आहे. तेव्हापासून राज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याप्रकरणी आधी एप्रिल महिन्यात 9 जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. दरम्यान पोर्नोग्राफी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. मुंबई क्राईम ब्रान्चला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मठ भागातील एका बंगल्यात धाड टाकली. 


त्याठिकाणी तेव्हा अश्लील चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. पोलिसांनी त्यावेळी एका महिलेला रेस्क्यू देखील केलं. चित्रपटांमध्ये काम देण्याचं वचन देत पॉर्न व्हिडिओमध्ये काम करण्यास भाग पाडलं. याप्रकरणी अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल केली.