मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Sushmita Sen's Brother Rajeev Sen) यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड सुरू आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. गरोदर असताना राजीवनं तिची फसवणूक केली असा गंभीर आरोप चारूनं केला होता. त्यानंतर एका मुलाखतीत त्या दोघांनी एक्स्ट्रा- मॅरिटल अफेअरचे आरोप केले. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत  चारु असोपानं खुलासा केला की राजीवनं तिला मारहान केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारूनं नुकतीच ETimes ला मुलाखत दिली. यावेळी मुलाखतीत चारूनं सांगितलं की राजीव तिला टोमणे मारायचा. तो म्हणाला की तुला डॉक्टरांची गरज आहे. तू मानसिक आजारी आहेस. चारुच्या म्हणण्यानुसार, राजीव तिला ड्रामेबाज देखील बोलायचा. चारूचं म्हणणं होतं की इतकी दिवस शांत होती कारण तिला हे सगळ बिघडवायचं नव्हतं. 


राजीव सेननं केली मारहान


चारू यावेळी म्हणाली, 'राजीवने तिच्यावर मारहान केली होती. याविषयी सांगताना ती म्हणाली, 'जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा मी पोलिसांना फोन करून तक्रार दाखल केली होती. माझ्याकडे अजूनही NOC कॉपी आहे. पण तो (राजीव सेन) प्रत्येक वेळी माफी मागायचा आणि मी त्याला माफ करायचे कारण मी त्याच्यावर प्रेम करायचे. माझं हे दुसरं लग्न होतं आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे असा माझ्या घरच्या लोकांचा माझ्यावर दबाव होता. नाहीतर लोक मला टोमणे मारतील की या मुलीतच काही प्रॉबलम आहे, म्हणूनच दुसरं लग्न टिकलं नाही. या कारणामुळे या लग्नात मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केले, पण मी निराश झाले. मला अजिबात आनंद झाला नाही. मला हा निर्णय घ्यावा लागला होता.'


काम सोड आणि घरी पतीसाठी जेवण बनव सासऱ्यांनी दिला सल्ला


चारू पुढे म्हणाली, 'राजीव सेन नेहमीच तिला फोनवर ब्लॉक करून अनेक महिने गायब रहायचा. एकदा तो 3 महिने बेपत्ता होता. चारूच्या म्हणण्यानुसार, राजीवच्या वागण्यावर तिचे सासरचे लोकही नाराज होते. त्यानंतर सासरच्यांनी चारूला काम सोडून राजीवसाठी जेवण बनवण्याचा सल्ला दिला. 'तो मला मोठ्यांसारखं Mature आहेस असं वागण्यास सांगायचा. सासरच्यांनी सांगितले की, 'तू ६ महिने काम सोडून त्याच्यासाठी स्वयंपाक करायला लाग. त्याला खूप आनंद होईल. लग्नानंतर राजीव मला सांगायचा की तू काम करशील तर हे लग्न चालणार नाही. तर लग्नापूर्वी दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत राजीव म्हणालe की, मी यापुढेही काम करावे अशी त्यांची इच्छा आहे.'



चारू आणि राजीव 2019 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही एकत्र कधीच सुखी नव्हते. त्यांनी या आधी एकदा घटस्फोट घेण्याचा निर्णय  नाते पुन्हा पुन्हा तुटायचे आणि मग ते एकत्र यायचे. त्यांना 1 वर्षाची मुलगी आहे. चारू आणि राजीवचे नाते अशा प्रकारे तुटल्याचे पाहून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.