मुंबई : छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' ही अतिशय लोकप्रिय मालिका. या मालिकेतील प्रत्येक पात्र घरां-घरात पोहचलं. मात्र  शेवंता आणि अण्णां नाईकच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आजही या दोन्ही पात्रांना खऱ्या नावापेक्षा प्रेक्षक पात्रांच्या नावावरुन पहिलं ओळखतात. तसंच या मालिकेतील अजून एक पात्र गाजलं होतं ते म्हणजे छायग्या.  या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, सुसल्या , छाया ,दत्ता ,माधव,सरिता यांच्या अभिनयाने पात्रात जिवंतपणा आला होता. कोकणी कुटुंब आणि त्यांची मालवणी बोली हे सगळं अगदी हुबेहुब या मालिकेत दाखवलं असल्याने प्रेक्षकांना ही पात्रं आपली वाटली होती . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रात्रीस खेळ चाले भाग 2'  मालिकेच्या दुसऱ्या पर्वात माधव,दत्ता, पांडू,छाया, सुशल्या या पात्रांच्या भूमिकेतून  बालकलाकार आपल्या भेटीला आले होते, या छोट्या मंडळींनी  मालिका उचलून धरली होती, या बालकलाकारांपैकी  'छोटी छाया' तुम्हाला आठवत असेलचं .... खट्याळपणा, अल्लडपणा  काय असतो ह्याच उत्तम उदाहरण देणारं हे पात्र. "आण्णा नाईकाचा चेडू आसयं " असं म्हणत घराघरात पोहचलेली ही छोटी छाया सध्या काय करतेय तुम्हाला माहितेय का?  
 
छोट्या छायाच्या  भूमिकेमुळं घराघरात पोहचलेली बालकलाकार मिताली साळगावकर. सध्या तिचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिचा बदलेला लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. खरंतर समोर आलेला हा व्हिडीओ सोनी मराठीवरील नवीन मालिका 'खरंच तिचं काय चुकलं'चा एक व्हिडीओ आहे.यामध्ये तिची भूमिका फार छोटी असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. या व्हिडीओमध्ये ती फुलं विकताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  मितालीने साकारलेली 'छोटी छाया' ही भूमिका तुफान गाजली होती. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या 'शेलिब्रिटी पॅटर्न' या कार्यक्रमामध्ये सुद्धा ती दिसून आली होती.  


ती सध्या काय करतेय...
मिताली आता मुंबईच्या साठे कॉलेजमध्ये शिकत असून कॉलेजच्या अनेक एकांकिका स्पर्धां करत आहे. तिनं  नुकतेच सोनी मराठीवरील  'खरंच तिचं  काय चुकलं' या मालिकेत छोटं पात्र साकारलं होतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मितालीचं शालेय शिक्षण हे वसईच्या ज़िल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झालं आहे , ती मूळची कोकणातली असल्यामुळे तिचं मालवणी भाषेवर प्रभुत्व आहे . वर्गात मिताली मालवणी भाषेतून  मित्रमैत्रिणींना ओरडत असतानाचा  तिच्या शिक्षकांनी व्हिडीओ काढला होता हाचव्हिडीओ नंतर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेच मितालीला रात्रीस खेळ चाले मालिकेच्या ऑडिशन साठी बोलवण्यात आलं होतं.