S*X Education चा क्लास सुरू असताना शिक्षक 10 मिनिटं उभे राहिले आणि नंतर ...अभिनेत्यानं केला मोठा खुलासा
अभिनेता Sumit Vyas नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं शाळेत झालेल्या एका प्रसंगा विषयी सांगितले आहे.
Sumit Vyas On Sex Eduction : OTT प्लॅटफॉर्मवरून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता सुमित व्यास (Sumit Vyas) आज लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सुमितनं बॉलिवूड चित्रपटांमध्येही अप्रतिम भूमिका केल्या आहेत. आता सुमित लवकरच 'जांबाज हिंदुस्तान के' (Jaanbaaz Hindustan Ke) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये सुमित दहशतवाद्याच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमितची भूमिका आणि त्याच्या खासगी आयुष्याविषयी त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुमितनं त्याच्या खासगी आयुष्यापासून त्याच्या करिअरपर्यंत सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
यावेळी सुमितला लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा 'छत्रीवाली' या त्याच्या चित्रपटाविषयी विचारण्यात आले. सुमितला विचारले की या विषयावर जितके चित्रपट आले ते फारसे हीट झाले नाही किंवा ते पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पसंती मिळाली नाही. त्यात 'छत्रीवाली' हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला, त्यामुळे या विषयावर चित्रपट बनवणे किंवा प्रेक्षक पाहणं हे अवघड आहे का? यावर उत्तर देत सुमित म्हणाला, ज्या विषयावर 'छत्रीवाली' हा चित्रपट आहे त्यावर काम करणं अतिशय अवघड आहे, कारण हा विषयचं अवघड आहे. जर त्याची पटकथा ही थोडीशी दुसऱ्या टॉपिकवर गेली तर ती पाहतांना लोकांचा घोळ होतो किंवा त्यांना काही कळत नाही, कंटाळवाणही होऊ शकतं. त्यामुळे मुद्द्याला घेऊन चालणं गरजेचं असते.
हेही वाचा : Akshay Kumar Record:बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा जलवा, पण रेकॉर्ड अक्षय कुमारच्या नावावर...
पुढे सुमितला प्रश्न विचारण्यात आला की खासगी आयुष्यात तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हाला सेक्सबद्दल सर्व काही माहित आहे आणि तुम्हाला त्या विषयी सगळ्या गोष्टी माहित आहेत? मी सामान्य शाळेत गेल्यामुळे मला लैंगिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. हा विषय तिथे कधीच शिकवण्यात आला नाही, खरं सांगायचं तर तिथे हा विषयच नव्हता. पण, मला आठवतं मी नववीत असताना सरकारने लैंगिक शिक्षणाचा वर्ग अनिवार्य केला होता. तर मी वर्गात असताना फॉर्मॅलिटीसाठी एक शिक्षक तिथे आले आणि त्यांनी पीपीटी बोर्ड लावला. ना मुलांनी काही विचारले ना शिक्षक काही बोलले. शिक्षक 10 मिनिटे उभे राहिले आणि नंतर त्यांनी पीपीटी बंद केला आणि तोच त्यांचा लैंगिक शिक्षणाचा वर्ग होता. त्यामुळे नंतर बोलल्यावरच या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या.