मुंबई : मनोरंजनाच्या दुनियेत अनेकदा स्टार्स हरवलेले असतात. या चमचमत्या जगात, अनेकवेळा स्टार्स इतके हरवले जातात की, ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यांच्या लाईफस्टाईलमुळे हे स्टार्स कधीकधी गंभीर आजारांना बळी पडतात. जगभरात अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांना ब्रेस्ट कँन्सरसारख्या आजाराचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील अनेक अभिनेत्रींना त्यांच्या आजाराची माहितीही नसते. मात्र, ब्रेस्ट कँन्सर झाल्यानंतर या अभिनेत्रीनी उपचारासाठी मैदान उतरल्या. एवढंच नाही तर उपचारादरम्यान होणाऱ्या वेदनाही या सुंदरींनी आनंदाने सहन केल्या. आजच्या या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.


 मित्तल छवी
अभिनेत्री छवी मित्तलने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आजाराविषयी सांगितलं होतं. एक भावनिक पोस्ट शेअर करत छवी मित्तल म्हणाली की, ती ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. छवी मित्तलच्या आजाराबद्दल ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.


शगुफ्ता अली (Shagufta Ali)
टीव्ही अभिनेत्री शगुफ्ता अलीलाही ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करावा लागला आहे. शगुफ्ता अलीला ब्रेस्ट कँन्सरशी लढण्यासाठी 9 केमोथेरपी घ्याव्या लागल्या. केमोथेरपीमुळे शगुफ्ता अलीची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. शगुफ्ता अलीला उपचारासाठी स्वत:चे सगळे दागिने विकावे लागले.


बारबरा मोरी (Barbara Mori)
काइट्स या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री बारबरा मोरी हिला अगदी लहान वयातच ब्रेस्ट कँन्सर निदान झालं होतं. जलद उपचारांमुळे बारबरा मोरीने अल्पावधीतच स्तनाच्या कर्करोगावर मात केली. 


हमसा नंदिनी (Hamsa Nandini)
2021 मध्ये, बातमी आली की साऊथ अभिनेत्री हमसा नंदिनीला ब्रेस्ट कँन्सरचं  निदान झाले आहे. तपासाअभावी हम्सा नंदिनीचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात पोहोचला होता. या आजाराची माहिती मिळताच हमसा नंदिनी यांनी केमोथेरपी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान हमसा नंदिनीचे सगळे केस गळले होते.


मुमताज (Mumtaz)
एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारी अभिनेत्री मुमताजला  ब्रेस्ट कँन्सरने ग्रासलं आहे. 2022 मध्ये मुमताजला तिच्या आजाराची माहिती मिळाली. 6 केमोथेरपी आणि 35 रेडिएशन उपचारांनंतर मुमताजने कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली.