Oscar Dream अपूर्णच; Chhello Show फेम भारतीय बाल कलाकाराचं निधन
हृदयद्रावक घटना... वयाच्या 10 व्या वर्षी बाल कराकारानं घेतला अखेरचा श्वास...
Chhello Show Child Actor Rahul Koli Died: यंदाच्या भारतातून ऑस्करमध्ये दाखल झालेला गुजराती सिनेमा 'छेलो शो' (द लास्ट फिल्म शो) (chhello show) फेम बालकलाकार राहुल कोळीचं (Rahul Koli) निधन झालं आहे. वयाच्या 10 व्या वर्षी चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतल्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली आहे. ल्युकेमिया आजाराने 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील कर्करोग रुग्णालयात राहुलचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी जामनगरजवळील त्यांच्या मूळ गावी हापा येथे शेक सभा घेतली. (chhello show gujarati movie)
राहुलचे वडील रामू ऑटोरिक्षा चालवतात. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी राहुलच्या निधनाने सर्वांनाच दुःख झालं. राहुलचे वडील दुःख व्यक्त करत म्हणाले, 'तो प्रचंड आनंदी होता. मला कायम बोलायचा 14 ऑक्टोबरनंतर आपले दिवस बदलतील. पण त्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला.'
14 ऑक्टोबर रोजी राहुलचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. तेव्हाच राहुलच्या निधनाला 13 दिवस पूर्ण होतील. पण कुटुंबाने राहुलचा सिनेमा पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने 12 दिवसांपूर्वी 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी 'छेलो शो' गुजराती सिनेमाची निवड केली आहे. 'छेलो शो'चे दिग्दर्शन यूएसस्थित दिग्दर्शक पान नलिन यांनी केलं आहे. सिनेमाची कथा राहुलच्या जीवनाभोवती फिरत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. (chhello show oscar award)