Chicken Party Dance Video Goes Viral:  तुम्ही आतापर्यंत नागीण डान्स पाहिला असेल किंवा वरातीमध्ये बेभान होऊन नाचणाऱ्यांना पाहिलं असेल. मात्र कधी कोंबडी डान्स पाहिलाय का? सध्या सोशल मीडियावर अशाच एका कोंबडी डान्सची तुफान चर्चा आहे. विशेष म्हणजे हा कोंबडी डान्स कोणी सामान्यांनी केलेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील 3 प्रसिद्ध व्यक्तींनी केलेला हा कोंबडी डान्स सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. इतर अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट करुन हा डान्स आवडल्याचं म्हटलं आहे.


कोंबड्यांची नक्कल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हा कोंबडी डान्स करणारे कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर! पती-पत्नी असलेल्या मिताली आणि सिद्धार्थबरोबर या डान्समध्ये सईही दिसत आहे. हा व्हिडीओ मितालीने 'चिकन पार्टी' या कॅप्शनसहीत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये डाव्या बाजूला 3 कोंबड्या अगदी लयबद्ध पद्धतीने नाचत असल्याप्रमाणे जागेवर उभ्या राहून हलत असल्याचं दिसत आहे. याच कोंबड्यांची नक्कल मिताली, सई आणि सिद्धार्थने केली आहे. 


काय आहे व्हिडीओमध्ये?


व्हिडीओत सर्वात समोर असलेल्या कोंबडीप्रमाणे मिताली हा चिकन डान्स करताना दिसतेय. तर मागील बाजूस असलेल्या कोंबडीची जागा सेलिब्रिटींच्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ चांदेकरने घेतली आहे. व्हिडीओमधील तिसरी कोंबडी ही अगदी झलक दाखवून जाते. ही तिसरी कोंबडी म्हणजे सई ताम्हणकर. या तिघांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन फारच भन्नाट असून हा व्हिडीओ पाहताच हसू आल्याशिवाय राहत नाही. 



सेलिब्रिटींच्या कमेंट्सचा पाऊस


या व्हिडीओला एका दिवसात दीड लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर त्यावर 1900 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. या कमेंट्समध्ये अनेक सेलिब्रिटींच्या कमेंट्सचाही समावेश आहे. हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदार यांनी या पोस्टवर कमेंट करुन, "कमाल वेडे. सिद्धार्थ, सईला बघून मज्जा आली. येड पिलू आहेच ते आणि मिताली खूप गोड," असं म्हटलं आहे. नम्रता संभेरावनेही या पोस्टवर कमेंट करत, "सई पाहुणा कलाकार आहे," म्हटलं आहे. अभिनेत्री आर्या अंबेकरने, "सई ताम्हणकरने गोंधळ्याचे हावभाव अगदी योग्य पद्धतीने केलेत," अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री प्रिया बापटने हसणारे इमोजी शेअर करत, "काय चाललंय हे?" असं विचारलं आहे. अमृता खानविलकर, मिथाली पालकर, क्रांती रेडकर, सुव्रत जोशी यासारख्या कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे.