हे कलाकार बालपणी सुपरहिट ठरले पण....
कोण आहेत हे 6 कलाकार?
मुंबई : बॉलिवूड जगतात असे अनेक सुपरस्टार्स आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली. या कलाकारांमध्ये श्रीदेवी, पद्मिनी कोल्हापुरे, सारिका, हृतिक रोशन आणि संजय दत्त यांचा सहभाग आहे. या सगळ्या कलाकारांनी अगदी लहानपणापासूनच सिनेमांत कामं करायला सुरूवात केली. तर...
तिकडे काही कलाकार असे आहेत ज्यांनी बालपणी खूप चांगल नाव केलं. पण मोठं झाल्यावर जेव्हा लीड मिळाला तेव्हा ते फ्लॉप ठरले. तर या 'बाल दिनी' जाणून घेऊया असे 6 कलाकार....
'गदर' मधील जीते (उत्कर्ष)
सनी देओलच्या गदर सिनेमात त्याच्या मुलाची भूमिका साकारणारा जीते म्हणजे उत्कर्ष आता मोठा झाला आहे. गदर सिनेमात जीतेच्या डायलॉगपेक्षा त्याचा निरागस चेहरा आणि त्याचा सरदारचा क्यूट लूक सगळ्यांना भावला. उत्कर्ष दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. अनिल यांनी उत्कर्षला 'जीनयस' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. पण हा सिनेमा चालला नाही.
जुगल हंसराज
जुगल हंसराजने 1983 मध्ये नसुरूद्दीन शाह यांच्या 'मासूम' सिनेमात बालकलाकार म्हणून काम केल. या सिनेमात जुलगसोबत उर्मिला देखील होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अतिशय सुपरहिट ठरला. त्यानंतर 1994 मध्ये 'आ गले लग जा' या सिनेमातून डेब्यू केला पण हा सिनेमा चालला नाही. 2000 मध्ये आलेला मोहब्बते हिट ठरला पण पुढे काही झालं नाही.
आफताब शिवदासानी
आफताब अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. एक अशी वेळ होती जेव्हा आफताबसाठी लोकं वेडे होते. 1987 मध्ये 'मिस्टर इंडिया' या सिनेमातून त्याने बालकलाकार म्हणून काम सुरू केलं. आफताबने 'मस्त' या सिनेमातून डेब्यू केला. पण त्याचं करिअर काही खास राहिलं नाही.
राजू श्रेष्ठा
बॉलिवूडमध्ये मास्टर राजू नावाने लोकप्रिय असलेला राजू श्रेष्ठाने बालकलाकार म्हणून काम केलं. 70 च्या दशकात आपल्या क्यूटनेसमुळे त्याने खास छाप सोडली. आजही लोक त्याचा तो चेहरा विसरलेले नाही. बालकलाकार म्हणून लोकप्रिय असलेला राजू पुढे मात्र आपली लोकप्रियता टिकवून ठेवू शकला नाही. त्याने मालिकांमध्ये देखील काम केलं.
सना सईद
शाहरूखची 8 वर्षांची मुलगी अंजली म्हणून सनाने खूप नाव कमावलं. "कुछ कुछ होता है' हा सिनेमा अतिशय हिट ठरला. पण मोठी झाल्यावर सना ती लोकप्रियता मिळवू शकली नाही. 'स्टूडंट ऑफ द इअर' या सिनेमातून तिने डेब्यू केली पण तो सिनेमा काही चालला नाही.
हंसिका मोटवानी
हंसिका बालकलाकार म्हणून मालिकांमध्ये दिसली. यामध्ये 'शका लका बूम बूम' या मालिकेचा सहभाग आहे. यासोबतच 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'सोन परी' यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं, पण बॉलिवूडमध्ये 'आपका सुरूर' हा सिनेमा हिट ठरला नाही.