Chinmay Mandlekar Son's Name : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. चिन्मय त्याच्या हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. चिन्मयला खरी ओळख द काश्मिर फाइल्समुळे खरी ओळख मिळाली होती. चिन्मय हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा त्याची स्तुती केली जात. मात्र, कधी तरी काही लोक बोलून जातात. मात्र, यावेळी नेटकऱ्यांनी त्याला त्याच्या मुलाचे नाव जहांगीर का ठेवले यावरून ट्रोल करायला सुरुवात केली. त्यावर त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकरनं (Neha Joshi Madlekar) ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे. (Chinmay Mandlekar's Wife Got Angry Over Her Sons Name )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही कमेंट्सचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यावेळी एक नेटकरी कमेंट करत चिन्मयला त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करत होता. हा नेटकरी म्हणाला, 'मला तर चिन्मय मांडलेकरनं त्याच्या पोराचं नाव जहांगीर ठेवले इथेच खटकलंय.' त्या नेटकऱ्यांच्या कमेंटवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



हे पाहता नेहानं त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे. 'गीयर ट्रोलर्स, ह्याचा आता कंटाळा आला.. 9 वर्षांच्या मुलाला किती काळ असं टार्गेट करणार आहे? प्रत्येक वेळी त्याच्या वडिलांचा नवीन चित्रपट प्रदर्शित  होत असताना तुम्ही त्याला ट्रोल करता. जहांगीर रतनजी दादाभाय टाटा हे देशद्रोही नव्हते... या देशासाठी या महापुरुषानं जे काही साध्य केलं ते अनेकांना लाभलं आहे. आमच्या मुलाचं नाव त्यांच्या नावावर आहे आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे. पण हे सगळं मी कोणाला सांगतेय? त्या लोकांना हे आधीच माहित नाही का.. द्वेषानं आंधळे झालेले ते लोक बाहेर काढण्यासाठी काहीही कारण शोधत असतात. संस्कार.. संस्कृती..नेमक काय असतात??, असं नेहा म्हणाली.


हेही वाचा : Akshaya Deodhar-Hardeek Joshi : संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड बातमी; हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना


पुढे या विषयी बोलताना नेहा म्हणाली, 'अवघ्या 9 वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘ कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात !! त्याच्या .. त्याच्या आई बद्दल वाट्टेलते असभ्य बोलणं म्हणजे संस्क्रुती जपणं ???? आम्ही माणुसकी..प्रेम जपणारी माणसं आहोत .. मला देण्यात आलेले संस्कार आणि आणि मूल्ये मला अशा तोंड लवपून हल्ला करणाऱ्या लोकांवर निषेध करायला शिकवतात.'