Chiranjeevi: अनेकदा अभिनयात येण्यापुर्वी कलाकार यांचे काहीतरी आयुष्यात वेगळं करण्याचे स्वप्न होते, असं आपण अनेकदा ऐकतो. त्याचसोबत त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आपल्याला लहानपणी मोठं होऊन काय व्हायचंचय असा प्रश्न मोठे आपल्याला विचारताना दिसतातच. त्यातून अनेक जणं वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. असंही होतं की आपण शिक्षण एका क्षेत्रात घेतो आणि आपलं करिअर हे दुसऱ्या क्षेत्रात करतो आणि तेही यशस्वी करतो. असेही अनेक कलाकार आहेत ज्यांचे नशीब हे पालटले आहे. तुम्हाला माहितीये का की तुम्ही आज ज्या एका सुपरस्टारला रूपेरी पडद्यावर पाहता तो आज कदाचित तुम्हाला क्रिकेटर म्हणून पाहायला मिळाला असता. यावेळी त्यांचीच चर्चा आहे. तुम्हाला वाटतं असेल की अभिनेता नक्की आहे तरी कोण? परंतु हा अभिनेता आज साऊथचा फार मोठा सुपरस्टार आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत नक्की हा अभिनेता कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिरंजीवी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला माहिती नसेल परंतु या अभिनेत्यानं एकेकाळी क्रिकेटरची बॅट हातात घेतली आहे. परंतु त्यावेळी असं काही घडलं की त्यांनी परत क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा क्रिकेट खेळण्यासाठी चिरंजीवी हे मैदानात गेले होते. तेव्हा क्रिकेट खेळताना त्यांच्या बोटाला जखम झाली आणि मग त्यांची ती जखम भरायला एक वर्ष लागले होते तेव्हा त्यानंतर मात्र त्यांनी क्रिकेट खेळणं सोडून दिले होते, असं देैनिक भास्करच्या एका वृत्तात लिहिलं आहे. आता अनेकदा ते मोठमोठ्या क्रिकेटर्ससोबत मॅचमध्ये खेळतानाही दिसतात. 


त्यानंतर त्यांनी जेव्हा अॅक्टिंगला सुरूवात केली तेव्हा मात्र त्यांचे नशीब पालटले. आज ते साऊथचे फार मोठे सुपरस्टार आहेत आणि त्याचसोबत त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आज ते 68 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा मुलगा राम चरणही या क्षेत्रातच सक्रिय आहे. 


हेही वाचा : अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्याहीपेक्षा जास्त मानधन घ्यायचा 'हा' सुपरस्टार; नाव माहितीये?


22 ऑगस्ट 1955 साली त्यांचा जन्म झाला आहे. त्याचसोबत ते लहानपणी अभ्यासातही एवढे हुशार नव्हते. त्यांना शाळेत कमी मार्क्स मिळाले होते म्हणून आईवडिलांचा ओरडाही मिळाला होता. त्यानंतर अभिनय क्षेत्रात येण्याचे जेव्हा त्यांनी ठरवले तेव्हा मात्र त्यांना वडिलांनी एकप्रकारे विरोधही केला होता. त्यांच्या वडिलांना या इंडस्ट्रीतल्या स्ट्रगलविषयी माहिती होते. तेव्हा त्यांनी चिरंजीवी यांना विचारले की एक फिल्म हीट झाल्यावर मग पुढे काय? परंतु आज त्यांचे चित्रपट हे एकावर एक हीट झाले आहेत. 


कॉमेडियन अल्लू रामलिंगय्या यांची कन्या सुरेखा यांच्याशी त्यांनी लग्न केले. अल्लू रामलिंगय्या यांना असे वाटत होते की त्यांच्या मुलीचा होणारा पती हा IAS अधिकारी असावा. परंतु त्यावेळी सुरेखा यांचे चिरंजीवी यांच्यावर प्रेम बसले होते. तेव्हा बऱ्याच संघर्षानंतर अल्लू रामलिंगय्या हे त्या दोघांच्याही लग्नाला तयार झाले.