मुंबई  : आज 30 एप्रिलला चित्रमहर्षी आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक  दादासाहेब फाळके यांची  जयंती आहे.  ज्या काळात केवळ नाटक आणि लोककलेमधून भारतातील लोकांचे मनोरंजन केले जात होते, त्याच काळात दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र भारतात आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करुन दिली. भारतीय चित्रपटाचे जनक, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची 153 वी जयंती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव  येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समोयोचित विचारही व्यक्त केले.  यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय भालेराव तसेच दादासाहेब फाळके यांचे कुटुंबीय, चित्रनगरी परिसरात चित्रित होत असलेल्या विविध सिनेमा, मालिकेतील कलाकार, सिनेजगतातील मान्यवर मंडळी, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 



धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानलं जातं  चित्रपट निर्मिती करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घरातील वस्तू, तसेच स्वत:च्या पत्नीचे दागिने देखील विकले. दादासाहेब फाळके यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. 


. १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली. 


 56 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'  या चित्रपटानं पुरस्कार पटकावला. बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार,  मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि रंगभूमी पुरस्कार हे पुरस्कार देखील या चित्रपटानं पटकावले होते.  46 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारानं देखील या चित्रपटाला गौरवण्यात आलं.   या चित्रपटाचं देशभरात कौतुक झालं. सिनेमाचा आभ्यास करणारे विद्यार्थी हा चित्रपट आवर्जुन बघतात.