मुंबई : प्रेक्षकांची लाडकी 'झी युवा' वाहिनी, हटके मालिका सर्वांसाठी घेऊन येते. एन.आर.आय नचिकेत आणि मराठमोळ्या सईची आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेली, 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' ही मालिका सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. नवनवीन सरप्रायझेस देण्यात सुद्धा ही वाहिनी आघाडीवर आहे. मालिकेला मिळणारे एखादे नवे वळण, एखाद्या नव्या पात्राची अचानक होणारी एन्ट्री, अशा गोष्टी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. असंच आणखी एक गोड सरप्राइझ 'झी युवा'च्या 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतून अनुभवायला मिळणार आहे. अनेकांना आपल्या तालावर नाचायला लावणारी फुलवा खामकर, या मालिकेत चक्क अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. उत्कृष्ट कोरिओग्राफर असलेली फुलवा, 'झी युवा'च्या या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुलवा या मालिकेत कोरिओग्राफरच्या भूमिकेतच दिसणार आहे. सईला नृत्याचे धडे देताना तिला पाहणे, हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम अनुभव असणार आहे. सई केतकर म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि फुलवा खामकर यांचे शास्त्रीय नृत्यावर पाय थिरकणार आहेत. यानिमित्ताने मालिकेतील मनोरंजन मोठ्या प्रमाणात वाढेल, हे मात्र निश्चित!!



'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेत अभिनय करण्याच्या या अनुभवाविषयी बोलताना, फुलवा फारच उत्साही दिसत होती. "झी युवाकडून मला या भूमिकेविषयी विचारण्यात आले. ही भूमिका नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. या मालिकेतून मी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पण, मी स्वतःचीच भूमिका या मालिकेत साकारणार असल्याने, मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण नाही. 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद झाला. मला ही संधी दिल्याबद्दल मी मालिकेच्या टीमची अत्यंत आभारी आहे. माझी ही भूमिका प्रेक्षकांना पसंत पडावी अशी माझी इच्छा आहे."


'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेत, सई आणि फुलवा यांचे बहारदार नृत्य पाहण्याची संधी गमावू नका. यासाठी पाहायला विसरू नका, 'झी युवा' सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता!!!