Dharmendra Chota Sunny Deol Dance Video: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आपल्या सोशल मीडियावरून कायमच सक्रिय असतात. सध्या ते अमेरिकेस वास्तव्याला आहेत. तरीही ते आपले व्हिडीओ, फोटो हे शेअर करताना दिसतात. यावर्षी त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. वयाच्या 82 व्या वर्षीही ते फारच एव्हरग्रीन दिसतात. या वयातही त्यांचा असेलला उत्साह पाहून भलेभलेही चकित होऊन जातात. सध्या त्यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यात त्यांचा डान्स पाहून तर सर्वच नेटकरी अवाक झाले आहेत. हा नाच पाहून 82 वर्षाय धर्मेंद्र यांच्यात एनर्जी संचारली आहे. चला तर पाहुया की नक्की या व्हिडीओत असं आहे तरी काय? हल्ली लहान मुलांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओचीही जोरात चर्चा आहे. 



हेही वाचा : तब्बल 21 पैकी फक्त 1 सुपरहीट! अपयशाचीच चव चाखलेल्या 'या' स्टारकीडला 13 वर्षांनी मिळतेय कमबॅकची संधी


यावर्षी सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट तूफान गाजला. 2001 साली आलेल्या 'गदर'चा हा रिमेक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे या चित्रपटाची यावर्षी तूफान चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर डंका मारला. 600 कोटींहूनही जास्त कमाई करत या चित्रपटानं जगभरात विक्रम केला. हा चित्रपट इतका सुपरहीट होईल याची कुणीच कल्पना केलेली नव्हती. त्यातून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेली कामगिरी पाहून सगळेच अवाक झाले. सनी देओल हा 65 वर्षांचा आहे आता त्याची म्हणता म्हणता सत्तरीही जवळ आली आहे. तेव्हा सत्तरीच्या उंबरठ्यावर मिळालेलं हे यश फारच कौतुकास्पद आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


@babies_town या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या यामुळे अभिनेते धर्मेंद्र यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या व्हिडीओत हा चिमुरडा आपल्याच जोशात मस्तपैंकी 'मैं निकाला गड्डी लेके' या गाण्यावर आपल्याच धुंदीत मस्त डान्स करताना दिसतो आहे. यावेळी या चिमुरड्याचा डान्स पाहून नेटकरीही भलतेच खुश झाले आहेत. त्यांच्या या व्हिडीओखाली नेटकरी त्याच्यावर मनापासून प्रेम करताना दिसत आहेत.