मुंबई : रस्त्यावर चोर सगळीकडे फिरत असतात.  या चोरांमुळे अनेकांनी स्वतःच्या मौल्यवान वस्तू गमावल्या आहेत. सर्वसामान्यांची चोरी होते हे आपण अनेकदा ऐकलं, पाहिलं असेल. पण आता तर CID मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनत्याची बॅग चोरांनी लंपास केली आहे. CID फेम अभिनेता ऋषिकेश पांडेच्या बॅगेमधील अनेक महत्त्वाच्या गोष्टींची चोरी झाली आहे. चोरी झालेल्या बॅगमध्ये अभिनेत्याचे महत्त्वाचे कागदपत्र, पैसे  आणि कार्ड होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CID फेम अभिनेत्याची बॅगची चोरी
ऋषिकेश पांडेने CID मध्ये इंस्पेक्टर सचिनची भूमिका बजावली. ऋषिकेश कुटुंबासह मुंबई दर्शनासाठी एसी बसने निघाला होता. याच दरम्यान अभिनेत्याच्या महत्त्वाच्या सामानाची चोरी झाली. त्याने स्लिंग बॅग कॅरी केली होती. 


खुद्द अभिनेत्याने घडला प्रकार एका मुलाखतीत सांगितला आहे. ऋषिकेशसोबत ही घटना 5 जून रोजी घडली. elephanta caves ला फिरायला जात असताना अभिनेत्यासोबत ही घटना घडली आहे. 


ऋषिकेश म्हणाला, 'आम्ही संध्याकाळी 6.30 च्या बसमध्ये चढलो. बसमधून उतरताच मी माझी स्लिंग बॅग तपासली. तेव्हा बॅगेत रोकड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कार बुक्स सर्व गायब झाल्याचं मला कळालं. मी कुलाबा आणि मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.'


'साआयडीमध्ये मी अनेकांच्या समस्या सोडवण्यात मदत केली. पण आता माझचं महत्त्वाचं सामान चोरीला गेल्यामुळे हशा पिकला आहे.' असं देखील अभिनेता यावेळी म्हणाला.