मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका टप्पूसेनेमुळे लहान मुलांना तर गोकुळ धाम सोसायटीतील एकीमुळे मोठयांना आवडते. मालिकेतील प्रत्येत कलाकार चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे. सामान्य कुटुंब कशा प्रकारे आपलं आयुष्य आनंदात जगतो याचा उत्तम दाखला म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. मालिकेत कलाकार सामान्य असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते फार वेगळे आहेत. त्यामधील माधवी भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सोनालिका जोशी(Sonalika Joshi). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनालिका खाऱ्या आयुष्यात प्रचंड बिनधास्त आहे. सध्या सोनालिकाचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  सोनालिकाच्या हातात सिगारेट आहे.  सोनालिकाचा हा बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. माधवी भाभीचं हे रुप पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.



2008 पासून सुरु आहे मालिका
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही सोनी सब चॅनलवर चालणारी लोकप्रिय मालिका आहे.   जुलै 2008 मध्ये प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तेव्हापासून टीव्हीवर  सुरु आहे.  ही मालिका 'दुनिया ने ऊंधा चश्मा' या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.